शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा
शिराळा: गाव, वाडी, शाळास्तरावर शासनाच्यावतीने आयोजित करणेत आलेल्या शाळापूर्वतयारी अभियान हा उपक्रम आदर्शवत असून तो शाळांचा दर्जा वाढविणारा असल्याचे प्रतिपादन सरपंच सुर्यकांत रावते यांनी केले .
जिल्हा परिषद शाळा टाकवे ( ता. शिराळा ) येथे पंचायत समिती शिक्षण विभाग शिराळा, जिल्हा परिषद शाळा,अंगणवाडी टाकवे यांचे सयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते . अध्यक्षस्थानी उपकेंद्राच्या डॉ. मंगल सावंत ह्या होत्या .रावते म्हणाले, प्राथमिक शाळेत विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षण घेत असून आपल्या पाल्याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे . त्यासाठी शिक्षक - पालक यांचा सुसंवाद गरजेचा आहे .
डॉ मंगल सावंत म्हणाल्या, शासनाने शाळा पूर्वतयारी या उपक्रमाने विद्यार्थी हा सर्व क्षमताधिष्ठीत होणेस मदत होणार असून शासनस्तरावर विविध उपक्रमाने विद्यार्थी हा कौशल्यधिष्टीत परिपूर्ण होणार आहे . प्रत्येक विध्यार्थ्याची शिक्षणाबरोबर आरोग्याची ही काळजी पालकांनी घेणे गरजेची आहे.
प्रारंभी गावातून ग्रंथदिंडी काढणेत आली . शैक्षणीक स्टॉलचे उद्घाटन करणेत आले .सरस्वती पूजन करून शाळापूर्वतयारीवर विद्यार्थीनींनी गीत सादर केले .स्वागत- व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी केले . प्रास्ताविक मुख्याध्यापक आर .सी. पाटील यांनी केले .आभार दमयंती सावंत यांनी मानले .
कार्यक्रमास उपसरपंच महावीर पाटील, पोलीस पाटील विनोद सुतार, सेवा सोसायटी अध्यक्ष संजय ठोंबरे, मुख्याध्यापक डी.डी. खाडे .,माजी पोलीस निरीक्षक शंकर जाधव, ग्रामपंचायत सदस्या गिता कराळे, कमल भोसले, गिता जाधव,सौ .विद्या माने, अनुराधा पाटील, पालकवर्ग उपस्थित होते .संयोजन भारती बडे, कमल सवाखंडे, प्रज्ञा जाधव, विद्या बनसोडे, चंद्रभागा रावते, अनिता सवाखंडे यांनी केले .
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments