शिक्षक संघ निवडणूक पूर्ण ताकतीने लढवणार |The teachers' union will fight the election with full force
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
वाळवा:स्वर्गीय शिक्षक नेते शिवाजीराव पाटील आण्णा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी समविचारी संघटनांना बरोबर घेऊन शिक्षक संघ शिक्षक बँक निवडणूक पूर्ण ताकतीने लढविणार असे प्रतिपादन अध्यक्ष अखिल भारतीय शिक्षक महासंघ नेते माधवराव पाटील यानी केले .
येलूर ता. वाळवा येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ व तरुण प्राथमिक शिक्षक मंडळाची कार्यकारी मंडळ सभा जिल्हा परिषद मराठी शाळा शिवाजीनगर येथे संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माधवराव पाटील होते.
यावेळी बोलताना म्हणाले , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ ही 104 वर्षाहून अधिक वारसा व इतिहास असणारी शैक्षणिक चळवळ आहे. संघटनेने अनेक लढे देऊन प्राथमिक शिक्षकांचे आर्थिक व सामाजिक जीवनमान उंचावण्याचे मोठे काम केलेले आहे. सांगली जिल्ह्यातील मातृ संघटना असतानाही शिक्षक बँक निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये व विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवता यावे यासाठी वेळोवेळी चर्चा करून देखील प्रस्थापित संघटना योग्य मानसन्मान व सर्वसमावेशक तोडगा न काढता फक्त चर्चेत गुरफटून ठेवण्याचे काम करीत आहेत.
त्यामुळे कुणाच्याही भूलथापांना बळी न पडता संघटनेच्या घटनेनुसार काम करणाऱ्या वैचारिक वारसा व निष्ठेने काम करणाऱ्या संघटना बरोबर चर्चा करून ठोस कृती कार्यक्रम तयार करण्याचे ठरविण्यात आले . ज्या संघटना बरोबर येतील त्या समविचारी संघटनांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक पॅनेल तयार करून स्वर्गीय शिक्षक नेते शिवाजीराव पाटील अण्णा यांचे स्वप्न साकार करण्यासाठी सांगली जिल्हा शिक्षक बँकेची निवडणूक लढवण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.
शिक्षक संघाचे संघटन मजबूत करण्यासाठी व शिक्षक बँकेबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जिल्हाभर दौरे काढून बैठका मीटिंग तसेच छोटे-मोठे मेळावे घेऊन शिक्षक संघाची ध्येयधोरणे बँकेबाबत असणारी भूमिका सभासदांपुढे मांडून जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. संघटना मजबुतीसाठी काही ठोस ठराव सर्वानुमते करण्यात आले . सभासदाभिमुख शिक्षक बँकेचा कारभार करण्यासाठी शिक्षक संघ कटिबद्ध असल्याचे सुतोवाच यानिमित्ताने करण्यात आले.
स्वागत व प्रास्ताविक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुकुंद सूर्यवंशी यांनी केले. यावेळी पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष विकास शिंदे ,जिल्हाकार्याध्यक्ष सुरेश पवार, पार्लमेंटरी बोर्ड सरचिटणीस वरिष्ठ मुख्याध्यापक वसंत सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी जिल्हा कायदासल्लागार धनराज पाटील, वाळवा तालुकाध्यक्ष बाजीराव पाटील, मिरज तालुकाध्यक्ष दयासागर बन्ने, जत तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर ,विटा खानापूर तालुकाध्यक्ष शकील तांबोळी,
माजी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत पाटील, ज्येष्ठ शिक्षक सिकंदर ढालाईत, वरिष्ठ मुख्याध्यापक अशोक परीट, जिल्हा उपाध्यक्ष भगवान वाघमोडे ,मिरज तालुका सरचिटणीस माणिक माळी, जत तालुका सरचिटणीस गुंडा मुंजे, कार्याध्यक्ष तानाजी टेंगले, उत्तम लेंगरे, अशोक मुचंडी, विष्णू ठाकरे, राजाराम पाटील उपस्थित होते, आभार जिल्हा सरचिटणीस सुनिल गुरव यांनी मानले.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments