shiv news
शिराळा,ता. २७: शिराळा व वाळवा तालुक्याच्या राजकारणाचा कळीचा मुद्दा व महाराष्ट्रभर बहुचर्चित असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटरच्या बंदिस्त पाईप लाईनच्या चाचणीचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे आज पाणी मानकरवाडी ते बेलदारवाडी दरम्यान आल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी समाज माध्यमावर आपल्या प्रतिक्रिया व पाण्याचे फोटो आणि व्हिडीओ टाकून आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली आहे.
गेले अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या पाहिलेली वाकुर्डेच्या पाण्याची स्वप्नपूर्ती लवकरच होणार असल्याने उत्तर भागाच्या लोकांच्यात जल्लोषी वातावरण तयार झाले आहे. मानकरवाडी ते रेड या १२ किलोमीटर बंदिस्त पाईप लाईनच्या चाचणीचे काम सुरु आहे. बेलदारवाडी पर्यंत ही चाचणी यशस्वी झाली आहे. पुढे रेड पर्यंत चाचणी घेण्यात येणार आहे. त्या नंतर रेड - मरळनाथपुर- शिवपुरी या साडे अकरा किलोमीटरच्या बंदिस्त पाईप लाईनची चाचणी घेण्यात येणार आहे.
आज चाचणी दरम्यान ठिकठिकाणी पाणी आल्याने परिसरातील शेतकर्यांनी आनंदोत्सव केला. ही योजना मार्गी लावण्यासाठी लोकनेते कै.फत्तेसिंगराव नाईक, आमदार मानसिंगराव नाईक, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक , विधानपरिषदचे माजी सभापती कै. शिवाजीराव देशमुख, सत्यजित देशमुख यांनी आपापल्यापरीने प्रयत्न केले.जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी गेले तीन वर्षात अर्थ संकल्पात भरवी निधीची तरतूद केल्याने या योजनेला गती मिळाली आहे. ही चाचणी यशस्वी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी अहोरात्र प्रयत्न करत आहे.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments