तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation

शिराळा :आदिवासी पारधी समाजाच्या संपुर्ण पुनर्वसना बाबत कोणतीही ठोस अंलबजावणी न झाल्यास दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्यावतीने संस्थापक अध्यक्ष प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन करणार करण्याचा इशारा दलित महासंघ युवक आघाडीचे अध्यक्ष सुधाकर वायदंडे यांनी दिला.
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
याबाबतचे निवेदन दलित महासंघाच्यावतीने प्रा.मधुकर वायदंडे यांनी तहसीलदार गणेश शिंदे यांना दिले. यावेळी शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावर उपस्थित होते. यावेळी शिंदे यांनी गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून घरकुलाचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
यावेळी सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघाच्यावतीने प्रा.मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पारधी पुनर्वसनासाठी गेली 20 वर्ष महाराष्ट्रभर लढा चालू आहे. परंतु वाळवा व शिराळा तालुक्यातील प्रशासनाच्या उदासीनतेमुळे पारधी समाजाचे पुनर्वसन रखडले आहे. राज्यभर पारधी पुनर्वसनासाठी ठोस उपाययोजना होत असताना शिराळा व वाळवा तालुक्यातील पारधी समाज सर्व योजनांपासून वंचित राहिला आहे.
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
ज्या लोकांना गावे दिलेली आहेत त्यांना अद्यापही घरकुलाचा किंवा इतर कोणताही लाभ मिळालेला नाही. अजूनही काही लोक उघड्यावर राहत आहेत. अशा लोकांचे गावामध्ये पुनर्वसन नाही. प्रत्येक वेळी प्रशासनाने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे.परिणामी पारध्यांना गावातून हाकलण्याचे प्रकार चालू आहेत. यासाठी पारधी पुनर्वसनाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहून ठोस अमलबजावणी करण्याची गरज आहे.
तर पुनर्वसनासाठी बेमुदत राहुटी आंदोलन |So indefinite Rahuti movement for rehabilitation
पारधी समाजाच्या संपुर्ण पुनर्वसनासाठी ठोस अंलबजावणी झाली नाही तर शिराळा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत राहुटी आंदोलन केले जाईल. निवेदनावर सुधाकर वायदंडे, पोपटराव लोंढे, दिनकर नांगरे, वैभव शिंदे, टारझन पवार, दीपक पवार, राकेश काळे, रोशना पवार, जहांगीर पवार, धर्मेंद्र काळे, गणेश पवार यांच्या सह्या आहेत.

0 Comments