शिराळा: येथे विवेकानंद व्याख्यानमाला बुधवार ६ ते ८ एप्रिल या काळात येथील पूल गल्ली येथील श्री दत मंदिर सभागृहात रोज ५• ३० होणार आहे अशी माहिती संस्थापक आमदार मानसिगराव नाईक व कार्याध्यक्ष सुमंत महाजन यानी दिली.
शिराळा तालुक्यातील लोकांचे प्रबोधन व्हावे, तालुका सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम व्हावा म्हंणून १९९८ साली मानसिंगराव नाईक, सुमंत महाजन, बी. टी. निकम, जेष्ठ साहित्यिक प्रा. वैजनाथ महाजन यांनी विवेकानंद सांस्कृतिक, क्रीडा व सेवा मंडळ या मंडळाची स्थापना केली. यामंडळा मार्फत विवेकानंद वृक्ष संगोपन स्पर्धा, विवेकानंद स्पर्धा परिक्षा, विवेकानंदन निबंध स्पर्धा इत्यादी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात. यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे विवेकानंदन व्याख्यानमाला .गेली २४ वर्ष अखंडपणे हे प्रबोधन सुरू आहे. हे २५ वे वर्ष आहे.
बुधवार ६ एप्रिल रोजी जेष्ठ अभिनेते, विचारवंत राहुल सोलापूकर हे “ अज्ञात स्वातंत्र्य संग्राम “ या विषयावर प्रथम पुष्प गुंफणार आहेत. गुरूवार ७ एप्रिल रोजी महाराष्ट्र प्रदेश महामंत्री लघुउद्योग भारती मुंबई व कॅासमॅास ग्रुपचे प्रमुख उद्योगपती भूषण मर्दे हे “ वैभव शाली भारत- स्वप्नपुर्ततेची संधी “ या विषयावर द्वितीय पुष्प गुंफणार आहेत. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सांगली च्या चेअरमनपदी निवड झाल्या बद्दल तर संचालकपदी निवड झाल्या बद्दल दीनदयाळ सहकारी सूतगिरणीचे एक्झिटिव्ह डायक्टर ॲड. राजेंद्र डांगे यांचा जाहिर सत्कार होणार आहे. शुक्रवार ८ एप्रिल कवी, गीतकार, पटकथा, लेखक, संवाद लेखक अरविंद जगताप हे “ सोशल मिडीया- आजची तरूणाई “ या विषयावर तृतीय पुष्प गुंफणार आहेत
. याच वेळी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक सांगलीच्या संचालकपदी निवड झाल्या बद्दल सत्यजित देशमुख व जि. प . सदस्य राहुल महाडीक यांचा जाहिर सत्कार आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानमालेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे संस्थापक आमदार मानसिंगराव नाईक, कार्याध्यक्ष सुमंत महाजन, सचिव संतोष देशपांडे, कार्यवाह प्रा. वैजनाथ महाजन , उपाध्यक्ष प्रा. प्रदीप पाटील, बी. टी. निकम यांनी केले आहे.
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments