शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
शिराळा : सोमवारी ( ता.२ ) शिराळा येथे शिवजयंती निमित्त गावातील प्रमुख मार्गावरून शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात येणार असल्याने सोमवारी असणारा आठवडा बाजार अन्य दिवशी घ्यावा या मागणीचे निवेदन एक गाव एक शिवजयंती नियोजन समिती मार्फत नगराध्यक्षा प्रतिभा पवार यांना देण्यात आले.
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
या निवेदनात म्हटले आहे, शिराळा येथे सोमवती एक गाव एक शिवजयंती नियोजन समिती मार्फत शिव जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्या निमित्त गावातील प्रमुख मार्गावरून शिवाजी महाराजांची मिरवणूक काढण्यात येणार आहे. सोमवारी शिराळचा आठवडा बाजार असल्याने मिरवणूक मार्गावर अडथळा येवू नये. त्यामुळे बाजारचा वार बदलावा.
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक यांनी चर्चा करून सोमवारी शिवजयंती असल्याने मिरवणूक मार्गावर अडथळा येवू नये व मंगळवारी अक्षय तृतीया हा सण असल्याने लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून रविवारी आठवडा बाजार घेण्यात आला आहे. तरी सर्व भाजीपाला विक्रेते, शेतकरी , व्यापारी वर्ग व नागरिकांनी रविवारी बाजारला येवून सहकार्य करावे असे आवाहन नगरपंचायतच्यावतीने नगराध्यक्षा प्रतिभा पवार यांनी केले आहे. यावेळी सुनिल पवार, नितेश निकम, सुमित निकम, तुषार यादव, श्रीकांत नलवडे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.
शिराळचा आठवडा बाजार रविवारी | Shirala's weekly market on Sunday
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments