SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
शिराळा:युनियन बँक ऑफ इंडिया शिराळा ने नेहमीच ग्राहकांना योग्य सेवा देत विविध योजनांचा लाभ दिला आहे. बँकेने नविन प्रशस्त जागेत स्थलांतर केल्याने ग्राहकांना समाधान वाटेल यात शंका नाही असे प्रतिपादन शिराळाचे तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
शिराळा येथे दत्त मंदिर शेजारी युनियन बँक शिराळा शाखेचा नुतन जागेत वास्तु प्रवेश कार्यक्रम प्रसंगी बोलत होते. प्रारंभी शिराळा शाखा प्रबंधक नितीन कुदळे यांनी स्वागत करून शिराळा शाखेचा प्रगतीचा आढावा घेतला. या वेळी तहसीलदार गणेश शिंदे यांचे हस्ते फित कापून नवीन वास्तू त प्रवेश करण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी संतोष राऊत, शिराळा नगरपंचायत चे मुख्याधिकारी योगेश पाटील यांचे हस्ते एटीएम व आतील दालनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी गटविकास अधिकारी संतोष राऊत, मुख्याधिकारी योगेश पाटील, क्षेत्र प्रमुख कोल्हापूर रामानंद टि. व्ही, उपक्षेत्रप्रमुख भावेश प्रकाश, सहायक व्यवस्थापक महेश बंगाळे, क्षेत्रीय कार्यालय कोल्हापूरचे मुख्यव्यवस्थापक रवी कुमार यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवनगरचे शाखा प्रबंधक अमोल खोत यांनी तर आभार मिरजेचे शाखा प्रबंधक राजेश जाधव यांनी मानले.
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही

0 Comments