shiv news
भाटशिरगाव (ता.शिराळा ) येथे अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक बसून मोटारसायकल चालक रामचंद्र कृष्णा पोवेकर ( वय ५५ , रा.नवजीवन वसाहत ,शिराळा) हे जागीच ठार झाले. सदर घटना आज सोमवार ता. २५ रोजी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत सचिन पोवेकर यांनी शिराळा पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे. पोलीसातून समजेलेली माहिती अशी रामचंद्र पोवेकर हे सहकारी संस्थेत नोकरीस होते. चिखली येथून ते घरी मोटारसायकल वरून येत असता भाटशिरगाव येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रस्त्यावर पडून त्यांचा मृत्यू झाला.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी भेट दिली. त्यांचे शिराळा येथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. तपास हवालदार सुभाष पाटील हे करीत आहेत. मयत रामचंद्र यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुली एक मुलगा दोन भाऊ असा परिवार आहे.
सहा तासात दुसरा अपघात
भाटशिरगाव येथे सकाळी साडे आकरा दरम्यान अपघात होऊन महाविद्यालयीन युवक अवधूत पाटील ठार झाला असतानाच भाटशिरगावच्या त्याच परिसरात ५०० मीटर अंतरावर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा झालेल्या अपघातात रामचंद्र पोवेकर यांचा मृत्यू झाला. तो ही शिराळ्याकडे जात असताना. सहा तासात दुसरा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments