shiv news
शिराळा,ता.२६:शिराळा येथील गोरक्षनाथ मंदिरात यात्रेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या .बनेवाडी, ता.वाळवा) येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बळवंत यादव ( वय ७०) भाविकाचा रस्ता ओलांडताना टेंपोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी टेम्पो चालक विजय संपत पाटील ( वय ३५ ,रा.नागराळे, ता.पलूस) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पुतण्या सुरेश यादव यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवार ता,२६ रोजी दुपारी एकच्या दरम्यान घडली. याबाबत शिराळा पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, आज पासून शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथ यात्रा सुरू झाली आहे.
एकादशी असल्याने प्रकाश यादव हे पत्नी शैलजा ,भावजय रंजना, पुतण्या सुरेश यांच्यासह गोरक्षनाथ दर्शनासाठी आले होते. त्यांचे कुटुंबीय दर्शनासाठी रांगेत उभे होते तर प्रकाश दर्शन घेऊन घेवून बाहेर येवून रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या झाडाच्या सावलीत बसण्यासाठी रस्ता ओलांडत होते. दरम्यान बिऊर कडून इस्लामपूरकडे जाणाऱ्या माल वाहतूक टेम्पोची त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये जखमी झाले. त्यांना टेम्पो चालक विजय पाटील यांनी त्याच टेम्पोतून उपचारासाठी इस्लामपूर येथे नेले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस हवालदार ज्योती पाटील करत आहेत.
दोन दिवसत तिघांचा मृत्यू
भाटशिरगाव येथे काल सोमवारी सकाळी साडे आकरा दरम्यान अपघात होऊन महाविद्यालयीन युवक अवधूत पाटील ठार झाला असतानाच त्याच परिसरात ५०० मीटर अंतरावर सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास पुन्हा झालेल्या अपघातात रामचंद्र पोवेकर यांचा मृत्यू झाला होता. आज त्याच गावापासून जवळपास एक किलोमीटर अंतरावर नाथ मंदिरा जवळ अपघात होऊन प्रकाश यादव यांचा मृत्यू तो ही देवदर्शना नंतर झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाथ दर्शनासाठी आलेल्या प्रकश यादव यांचे निधन | Prakash Yadav, who came for Nath Darshan, passed away
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments