BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement


नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement

Feature Slides

shiv news 

 

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement


शिराळा, ता.२६:शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रेसाठी सांगली,सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक दिंड्या जयजय राम कृष्ण हरी च्या गजरात  व  टाळ मृदुंगाच्या निनादात हजर झाल्या आहेत. महायोगी गोरक्षनाथ यात्रेला हजारो भाविकांच्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. पहाटे तीन वाजता पीर परासनाथ महाराज यांच्या हस्ते गोराक्षनाथांची पूजा करून अभिषेक  घालण्यात आला.

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement

 

     शिराळा येथील गोरक्षनाथ यात्रा ९ दिवस भरते. या ठिकाणाला प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. यात्रेला येणाऱ्या भाविकांच्यासाठी खासदार संजय पाटील यांनी खिचडीची तर आमदार विनय कोरे यांनी थंड पाण्याच्या टँकरची सोय केली होती.


    पहाटे पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी रिघ लागली होती.मंदीर प्रशासनाने येणाऱ्या सर्व भाविकांना उपवासाच्या फराळाची सोय केली होती. शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी यात्रेमध्ये कोणत्या ही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडू नये याची दक्षता घेऊन पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला आहे.

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement

 

मठाधिठपती पारसनाथजी महाराज, आनंदनाथजी महाराज यांच्या सह तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, स्वप्नील निकम, संतोष हिरुगडे हे यात्रेसाठी अविरत कार्यरत आहेत. तर  यात्रेमध्ये १०८गाड्यांसह दोन वैद्यकीय पथके चोवीस तास कार्यरत आहेत. यात्रा मार्गावर आनंद हॉस्पिटल व कै. बाबा नाईक प्रतिष्ठापनच्या वतीने वसंत पाणपोईची सोय करण्यात आली आहे.

नाथ यात्रा उत्साहात | Nath Yatra in excitement










भारती



-----------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------------------------

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019


Post a Comment

0 Comments