BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

पैलवानकीची ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

"पूर्वी सातारा आणि सांगली हे दोन जिल्हे मिळून एकच सातारा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. आत्ताच्या सातारला उत्तर सातारा आणि आजच्या सांगली जिल्ह्याला दक्षिण सातारा म्हणत. सातारला जोडून कोल्हापूर जिल्हा असल्याने कोल्हापूर, सातारा व सांगली हे जिल्हे सातारकरांना जिव्हाळ्याचे वाटतात. सांगली जिल्हा कृष्णामाईच्या कृपेने पहिल्यापासूनच तुलनात्मकदृष्ट्या बागायतीपट्टा म्हणून सधन राहिला आहे. अशा दक्षिण सातारामधील एक दिलखुलास, सदा हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणून कैलासवासी नानासाहेब महाडिक यांचे नाव नेहमीच सातारा, सांगली जिल्ह्यातच नव्हे; तर पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात सदैव अग्रस्थानी राहणार आहे. कै. नानासाहेब यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या कौटुंबिक ऋणानुबंध असलेल्या खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना."

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice
 
 दीनदुबळ्यांचा कैवारी आणि मीपणाचा अभिनिवेश हीन असलेल्या हसतमुख स्वभावाच्या कैलासवासी नानासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमधून मोठ्या कष्टाने आपले उद्योग उभे केले. कालांतराने त्यांनी विविध व्यवसायांमध्ये आपला चांगला जम बसवला आणि सर्वसामान्यांसह सर्व स्तरातील व्यक्तींमध्ये एक आदरयुक्त दबदबा निर्माण केला. 

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

शेतकऱ्यांची किंवा ग्रामीण भागातील कोणीही व्यवसाय करू शकत नाहीत या पूर्वापार चालत आलेल्या संकेतांना छेद देत कैलासवासी नानासाहेब महाडिक यांनी प्रचंड, व्याप असलेला उद्योगसमूह निर्माण के ला. पैलवानकीचा पिंड असलेल्या आणि पैलवानकी करण्यासाठी कमावलेले आरोग्य आणि ताकत कैलासवासी नानासाहेब यांनी नेहमीच अन्यायाविरुद्ध वापरली. कोणावर अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहन करायचा नाही या तत्त्वाशी शेवटपर्यंत निगडित राहिले.

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

कैलास वासी नानासाहेबांनी आमच्यासारख्या तरुणांवरही आपल्या कुटुंबातील सदस्या-प्रमाणे निर्व्याज प्रेम केले. त्यांचे  वाळवा तालुक्यातील येलूर हे मूळगाव. तथापि, १९७८ ते १९८० यादरम्यान ते पेठनाका येथे व्यवसायानिमित्त स्थायिक झाले. त्यापूर्वी १९६६ मध्ये त्यांनी नेव्हीमध्ये भरती होऊन काही वर्षे देशसेवा केली. आपल्या मातीचे ऋण मानून देशसेवा करणाऱ्या नानासाहेब यांनी कुस्ती या क्रीडाप्रकारास सातत्याने प्रोत्साहन दिले. अनेक होतकरू, कुस्ती प्रशिक्षण घेणाऱ्या मल्ल युवकांना ते आर्थिक रसद पुरवत असत. शिक्षण क्षेत्रात श्री व्यंकटेश्वरा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आणि सहकार क्षेत्रात नानासाहेब महाडिक मल्टिस्टेट अर्बन क्रेडिट सोसायटीचे माध्यमातून त्यांनी केलेले उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कार्य अधिक जोमाने सुरू आहे.

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

ग्रामीण भागाशी नाळ असलेल्या या धुरंधर नेत्यास तितक्याच जाणिवेने नागरी समस्यांचेदेखील भान होते. वाढते नागरीकरण लक्षात घेऊन नागरी संस्थांचा विकास आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान यांच्या साहाय्याने सकारात्मक पद्धतीने झाला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. या दृष्टिकोनामधूनच त्यांनी सातारा, सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषदेच्या आमदारकीची दोन वेळा लढवलेली निवडणूक अतिशय अल्पमतांनी गमावली. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या नानासाहेबांनी हे पराभवसुद्धा नम्रपणे स्वीकारून घेतलेला वसा पुन्हा नव्या जोमाने पुढे चालू ठेवला. कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे सामोरा जाणारा आणि सदा हसतमुख आणि दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या नानासाहेबांचे व्यक्तिमत्त्व इतक्या लवकर नियती आपल्यामधून हिरावून नेईल असे स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. आपल्या एकूण बारा बहीण-भावंडात सर्वात लहान असलेल्या आणि लहानपणी बटू पंत या टोपण नावाने ओळखले गेलेले आणि खऱ्या अर्थाने रॉयल असणारे नानासाहेब आज आपल्यात नाहीत; परंतु त्यांनी केलेल्या कार्यामुळे आणि दिलेल्या विचाराद्वारे त्यांचे  अस्तित्व आपल्याला चिरंतन प्रेरणा देत राहणारे आहे.

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice
 
फोंडा येथे सन १९८४ मध्ये त्यांनी परंपरागत आणि आधुनिक पद्धतीचा सुयोग्य वापर करून फळबाग शेती लागवड यशस्वी करून दाखवली. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' या ओळीनुसार त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षवल्ली वाढविण्यासाठी हरत-हेचे प्रयत्न केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यशासनाने सन १९९०मध्ये  त्यांचा  वनश्री पुरस्काराने गौरव केला.

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

आज कै. नानासाहेबांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी  राहुल आणि सम्राट हे दोन्ही पुत्र तितक्याच तोलामोलाचा नानासाहेब महाडिक यांनी घालून दिलेला वारसा नेटाने पुढे चालवत आहेत. त्यांचे  अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी ते रात्रीचा दिवस करून समाजासाठी योगदान देत आहेत. स्वार्थी पक्षीय भावनेपलीकडे जाऊन ज्याप्रमाणे नानासाहेबांनी आमच्यासह अनेकांना प्रेम दिले, त्याच भावनेतून आम्ही स्वतः  राहुल आणि  सम्राट महाडिक यांच्याबरोबर आजही आहे आणि नेहमीच असणार आहोत. नानासाहेब  यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित स्मरणिका प्रकाशन सोहळा, पुतळा अनावरण सोहळा या कार्यक्रमांना आमचा सहभाग राहणार आहेच. तथापि, __ या अनुषंगाने होणाऱ्या सर्व कार्यक्रम, उपक्रमांना आमच्या मनापासून शुभेच्छा!

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले खासदार, राज्य सभा

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना 
Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

पैलवानकीची  ताकत अन्यायाविरुद्ध वापरणारे नाना Nana uses the power of wrestling against injustice

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  पक्ष प्रवेश

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

 हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता  कधीच नाही

ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी

Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments