शिराळा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरती केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ तहसीलदार कार्यालया समोर शिराळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. संबधितावर कठोर कारवाई करावी या बाबतचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, शिराळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी तालुका अध्यक्षा साधना पाटील , माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, माजी सभापती सम्राटसिंह नाईक, सुखदेव पाटील यांनी केले.
यावेळी विराज नाईक म्हणाले, पवार यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर काही लोकांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे एस.टी. कर्मचाऱ्यांनी भ्याड हल्ला केला. असा अनुचित प्रकार आज अखेर महाराष्ट्रमध्ये कधी घडलेला नाही. सदरचे कृत्य लोकशाहीला शोभणारे नाही. या कृत्यामागे कोणकोणत्या लोकांचा हात आहे याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
रणधीर नाईक म्हणाले, या घटनेचा आम्ही निषेध करतो. या कृत्यामागे असणाऱ्या झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.
यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पवार, माजी उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, शिराळा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. शैलेश माने, शिराळा शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित गायकवाड, नगरसेविका सुनंदा सोनटक्के, सीमा कदम, सुजाता इंगवले,वैशाली कदम,
अर्चना कदम, रुपाली कदम, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा शीतल पाटील, अनिरुद्ध नलवडे, सुनील कवठेकर,विश्वासचे संचालक विश्वास कदम, महदेव कदम, राजू निकम, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, प्रमोद पवार ,अजय जाधव, सागर नलवडे, उत्तम डांगे, संजय हिरवडेकर,मोहन जिरंगे, शिवाजी शिंदे, सुनील पवार,रवी पाटील उपस्थित होते.
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments