सागाव (ता.शिराळा) येथील मोटारसायकल चोरी प्रकरणी संशयित आरोपी धनंजय रंगराव कुंभार (वय २०) रा.मांगले यास शिराळा पोलिसांनी अटक केली.
ही घटना मंगळवार (ता.५) रोजी सकाळी घडली. याबाबत जगन्नाथ शंकर पाटील रा.सागाव (वय५५) यांनी शिराळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी , काल मंगळवारी सकाळी मांगले- सागाव रोडवरुन जगन्नाथ पाटील यांची एम एच १० सीजे २३१२ ही मोटारसायकल चोरीला गेलेली होती.
याबाबत पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली मांगले, चिखली,सागाव , नाटोली या ठिकाणी तपास केला. त्यावेळी नाटोली येथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहून संशयित म्हणून धनंजय यास ताब्यात घेतले.
त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याच्या तपास कामी पोलिस हवालदार कालिदास गावडे, विनोद जाधव, हरेश पितळे, नितीन घोरपडे, दिपक हांडे, अमर जाधव, गणेश झांझरे यांनी हालचाल करून त्यास ताब्यात घेतले.. पुढील तपास दिपक हांडे करत आहेत.
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments