मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
shiv news
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
शिराळा ,ता. २७: औरंगाबाद सिडको कॉलनीत राहणाऱ्या मातंग समाजातील मनोज शेषराव आव्हाड याच्यावर चोरीचा खोटा आळ आणून त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशी द्यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार गणेश शिंदे यांना प्रा. मच्छिंद्र सकटे यांच्या दलित महासंघाच्यावतीने देण्यात आले.
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
या निवेदनात म्हटले आहे, मनोज शेषराव आव्हाड हा एका मंगल कार्यालयात वॉचमन म्हणून काम करत होता. त्या ठिकाणी लाईट व वायरची चोरी झाली होती. ती मनोजने केली असा संशय घेवून सतीश खरे, आनंदा सोळस,आनंदा गायकवाड,सागर खरात व नगरसेवकचा भाऊ अष्टपाल गवई व त्यांच्या साथीदारांनी त्यास २० एप्रिल २०२२ रोजी मंडपाचे काम करायचे आहे असे सांगून घरातून बोलवले. त्या नंतर मेगवाले सभागृह येथे त्याचे हातपाय बांधून लाकडी दांडके व लोखंडी पाईप ने अमानुषपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. ही महाराष्ट्राला काळींबा फासणारी घटना आहे.
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
यास गृह विभाग जबाबदार आहे. दलितांच्यावरील वाढत्या घटनेबाबत तीव्र आंदोलन छेडले जाईल. होणाऱ्या परिणामास शासन दबाबदार असेल. मयत मनोज यास पत्नी,दोन लहान मुले , आई असे कुटुंब आहे. त्यांचा चरितार्थ हा मनोजवर चालत होता. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची आता वाताहत सुरु आहे. त्यामुळे शासनाने याची गांभिर्याने दाखल घेवून त्याच्या कुटुंबास जास्ती जास्त आर्थिक मदत देवून कुटुंबाचे पुनर्वसन करावे. आरोपींना तात्काळ अटक करून हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून त्यांना फाशी द्यावी.
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष शंकर महापुरे ,सांगली जिल्हा संघटक रवींद्र बल्लाळ,सांगली जिल्हाध्यक्ष विकास बल्लाळ ,वाळवा तालुकाध्यक्ष संतोष चांदणे, विभागीय अध्यक्ष अधिक देवकुळे, महिला आघाडी अध्यक्षा सीमाताई आवळे ,माजी सरपंच सुधीर बाबर, पोलीस पाटील आनंदा बडेकर ,शिराळा तालुका सरचिटणीस सचिन मोरे शिराळा तालुका उपाध्यक्ष संतोष लोंढे,महादेव समिंद्रे , प्रवीण तडाखे, किरण समिंद्रे , दीपक मिसाळ ,निखील पाटील अनिल थोरात, पांडुरंग बल्लाळ यांच्या सह्या आहेत.
मनोजच्या मारेक-यांना फाशी द्या | Hang Manoj's killers
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments