गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
Feature Slides
shiv news
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
पहा गोरक्षनाथ आरती
शिराळ्या पासून दोन किलोमीटर अंतरावर तोरणा व मोरणा नदीच्या संगमावर श्री. गोरक्षनाथांचे मंदिर आहे.या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. ज्या लोकांना आषाढी यात्रेला पंढरपूरला जाता येत नाही ते लोक येथे नाथ दर्शनाला येतात. येथे सांगली,सातारा,कोल्हापूर जिल्ह्यातून हजारो भाविकांची गर्दी असते.
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
येथे हनुमान जन्मोत्सवा नंतर येणाऱ्या एकादशी पासून यात्रेस प्रारंभ होतो."ही यात्रा ९ दिवस सुरू असते. यात्रेच्या पहिल्या दिवशी राज्यातील विविध भागातून वारकरी दिंड्या येतात. त्या दिवशी सकाळी ७ ते९ पर्यत पालखीची मिरवणूक शिराळा गावातून काढली जाते. तिसऱ्या दिवशी सवाद्य मिरवणुकीने दहीहंडी निघते.
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
गोरक्षनाथ येथे काही दिवस वास्तव्यास होते. याची साक्ष म्हणजे शिराळाची नागपंचमीची. शिराळ्यात गोरक्षनाथ यांनीच जिवंत नागाची पूजा सुरू केल्याची आख्यायिका आहे. नाथ शिराळा येथे महाजन यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले.त्यावेळी महिलेस भिक्षा देण्यास वेळ का झाला असे नाथांनी विचारले. त्यावेळी मी मातीच्या नागाची पूजा करत असल्याचे कारण महिलेने सांगितले.त्यावेळी तू जिवंत नागाची पूजा करशील का असे नाथांनी विचारताच महिलेने होकार दिला.त्या ठिकाणी जिवंत नाग प्रकट झाला.त्या वेळे पासून शिराळ्यात जिवंत नाग पूजा सुरू झाली.
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
पूर्वी येथे घनदाट झाडी होती. सध्या विरळ झाली असली तरी परिसर निसर्ग संपन्न आहे. मंदिरला लागूनच गोरक्षनाथांचा सध्याचा मठ आहे. पूर्वी येथे गोशाळा होती.त्या नंतर ती बंद झाली. सध्याचे मठाधिपती पारसनाथ महाराज यांनी गो शाळा पुन्हा सुरू केली आहे. त्यांच्या हाती मठाचा कारभार आल्या पासून त्यांनी मठ परिसराचा कायापालट करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
कोरोनाच्या काळात दोन वर्षे मंदिर व यात्रा बंद होती. दोन वर्षाच्या कालावधी नंतर या वर्षी मोठ्या उत्साहात यात्रा भरत आहे. त्यासाठी पाळणे, खेळणी व खाद्य पदार्थांचे दुकाने दाखल झाली आहेत. नगरपंचायतने पाणी ,स्वच्छतेची सुविधा निर्माण केली आहे. येणाऱ्या वारकरी दिंड्यासाठी व भाविकांना पीर परासनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आनंदनाथ महाराज यांनी दूध,खिचडी व भोजन व्यवस्था केली आहे. खासदार संजयकाका पाटील व आमदार विनय कोरे यांच्या मार्फत खिचडी वाटप होणार आहे.
गोरक्षनाथ यात्रा |Goraksanath Yatra
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments