चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
शिराळा( ५ एप्रिल) :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या पैकी चौथा संशयित आरोप रमेश तुकाराम घाग (वय ५३) रा.बामणोली (ता. संगमेश्वर) यास ताब्यात घेतले आहे. गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकल , एक बंदूक व बॅटरी वन विभागाने जप्त केली आहे. त्यास देवरुख न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ७ तारखे पर्यंत वन कोठडी दिली आहे.
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
एक एप्रिलला यातील संदिप तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन , मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ ता. संगमेश्वर या तीन आरोपींना रत्नागिरी न्यायालयाने ७ एप्रिल पर्यंत वन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने शस्त्रासहित व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विणापरवाना घुसणे आरोपींना चांगलेच महागात पडले .
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेन्यात आरोपी ३१ मार्च रोजी दिसून आले. त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी दाखल केला. वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी या घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयास माहिती दिली होती. त्यानुसार विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांनी चांदोली येथे तपास पथक तयार करून पुढील तपासाची दिशा ठरवली.
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात चौकशी केली. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी हातिव ( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला. त्यावेळी संदीप तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन संशयीत आढळून आला . त्याला चौकशीसठी ताब्यात घेतले.
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
२ एप्रिलला तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार मारळ( ता. . संगमेश्वर) येथील मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ या दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात होते.त्यांना रत्नागिरीच्या न्यायाधीशांनी आरोपींना ७ एप्रिल पर्यंत वनकोठडी सुनावली आहे.
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
सादर कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत , उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे , चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे , फिरते पथकचे वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार , वनपाल एच.ए. गारदी , वनरक्षक गोठणे, रामदास दणाने वाहनचालक सचिन पावर , अनंत मुळे , सागर पाटील, वन्यजीव प्रेमी प्रतिक मोरे यांनी केली . त्यांना रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी दिपक खाडे , वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका लगड , वनपाल देवरूख तौफिक मुल्ला , वनरक्षक गावडे व पोलिस पाटील , सरपंच यांची मदत मिळाली.
चौथा आरोपी अटकेत | Fourth accused arrested
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा - असा झाला शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
हे ही वाचा- - जयंतराव पाटील म्हणतात शिवाजीराव नाईक आणि आमच्यात वैयक्तिक कटुता कधीच नाही
ᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙᵙ
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments