सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting

शिराळा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील गोठणे (ता. शाहुवाडी) येथील गाभा क्षेत्रात विनापरवाणा शस्त्रास्त्रासह घुसलेल्या संदिप तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन , मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, मारळ ता. संगमेश्वर या तीन आरोपींना रत्नागिरी न्यायालयाने ७ एप्रिल पर्यंत ०५ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting
याबाबत समजलेली माहिती अशी, अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेसाठी लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेन्यात आरोपी ३१ मार्च रोजी दिसून आले. त्याचा वनगुन्हा वनरक्षक रामदास दणाने यांनी तात्काळ जारी करून वनपरिक्षेत्र कार्यालयास घडलेल्या घटणेबद्दल अवगत केले . वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकुमार नलवडे यांनी घटनेबाबत कराडच्या विभागीय कार्यालयाला कळवून उपसंचालक उत्तम सावंत विभागीय वन अधिकारी , चांदोली राष्ट्रीय उद्यान विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू केला .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting
विभागीय कार्यालयातून सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे, फिरते पथकाचे शिशुपाल पवार यांना चांदोली येथे पाचारण करण्यात आले . त्याप्रमाणे चांदोली येथे तपास पथक तयार करण्यात आले. पुढील तपासाची दिशा ठरविण्यात आली . तपास पथकाने सर्वप्रथम आंबा घाटातून व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिमेकडील उतारावरील आसपासच्या गावात जाऊन चौकशी करण्यास सुरू केली . खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १ एप्रिल रोजी हातिव ( गोठणे पुनर्वसित ) गावात जाऊन तपास केला . वन्यजीव विभागाचे तपास पथक पोहचताच गावात संशयास्पद हालचाली दिसून आल्या . त्यामुळे कसून चौकशी केली असता संदिप तुकाराम पवार ,रा. हातिव- गोठणे पुनर्वसन हा संशयीत आरोपी आढळून आला . त्याला चौकशीसठी ताब्यात घेण्यात आले . चौकशीअंती त्याने व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने अपप्रवेश केल्याचे मान्य केले .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting
२ दोन एप्रिलला तपासाअंती सदर प्रकरणात अजून दोन आरोपी असल्याचे निष्पन्न झाले . त्यानुसार मारळ ता . संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी येथील मंगेश जनार्दन कामतेकर व अक्षय सुनील कामतेकर, रा. गुरववाडी, दोघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले . वरील तीनही आरोपींनी वन्यजीव विभागाच्या हद्दीत शस्त्रास्त्रासह शिकारीसाठी गेल्याने कॅमेऱ्यात आल्याचे कबूल करून केलेला गुन्हा मान्य केला . त्यानुसार वरील आरोपींना वन्यजीव कायदा १ ९ ७२ अन्वये अटक करून त्यांची देवरूख येथे वैद्यकीय चाचणी केली . देवरुखचे प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी रजेवर असल्याणे रत्नागिरीच्या न्यायदंडाधिकारी यांच्याकडे पेश करण्यात आल्यानुसार आरोपींना ७ एप्रिल पर्यंत ५ दिवसाची वनकोठडी ( फॉरेस्ट कस्टडी ) सुनावली .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting
शिकारीच्या उद्देशाने शस्त्रासहित व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विणापरवाना घुसणे आरोपींना चांगलेच महागात पडले . सदर गुन्ह्यात अजून आरोपी असण्याची शक्यता , गुन्ह्यात वापरलेली शस्त्र जप्त करणे , वन्यप्राण्याच्या शिकारीची शक्यता या शक्यतांमुळे आरोपींना जामिन मिळू शकला नाही . आरोपींकडून हस्तगत केलेल्या मोबाईलमध्ये संशयास्पद छायाचित्रे आढळून आल्याने अधिकचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे .
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात विनापरवाणा शिकारीच्या उद्देशाने शस्त्रास्त्रासह घुसलेल्या तिघांना वन कोठडी | Forest Cell for three persons who entered the Sahyadri Tiger Reserve with weapons for the purpose of unauthorized hunting
वरील कारवाई सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक नानासाहेब लडकत , उपसंचालक उत्तम सावंत, विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या तपास पथकातील सहाय्यक वनसंरक्षक गणेश पाटोळे , चांदोली वन्यजीवचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे , फिरते पथकचे वनक्षेत्रपाल शिशुपाल पवार , वनपाल निवळे एच.ए. गारदी , वनरक्षक गोठणे, रामदास दणाने वाहनचालक सचिन पावर , अनंत मुळे , सागर पाटील, वन्यजीव प्रेमी प्रतिक मोरे यांनी केली . रत्नागिरी वन विभागाचे विभागीय वनाधिकारी दिपक खाडे , वनक्षेत्रपाल श्रीमती प्रियंका लगड , वनपाल देवरूख तौफिक मुल्ला , वनरक्षक गावडे व पोलिस पाटील , सरपंच यांची मदत लाभली.

0 Comments