दत्त सेवा विद्यालय तुरूकवाडी संचलीत कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबिर | Datta Seva Vidyalaya Turukwadi Sanchalit Kusti Hech Jeevan Maharashtra Summer Wrestling Training Camp
shiv news
तुरूकवाडी (ता. शाहुवाडी) येथे दत्त सेवा विद्यालयाच्यावतीने १ मे २०२२ पासुन उन्हाळी कुस्ती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचा मुख्य उद्देश म्हणजे बदललेल्या युगात आंतरराष्ट्रीय पातळीवर बदललेली कुस्ती, पुर्वीची मैदानी कुस्ती आणी अलीकडील स्पर्धात्मक कुस्ती यातील फरक समजुन सांगणे व ग्रामीण भागातील मुलांना आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम माहित होणे हाच आहे. या शिबीरासाठी अनेक अनुभवी प्रशिक्षक असणार आहेत. मुलांना राहण्यासाठी प्रशस्त खोल्या , चांगल्या प्रतीचे जेवण, दुध, केळी व्यवस्था वेळच्या वेळी असणार आहे.
खेळण्यासाठी मॅट, मातीचा आखाडा, प्रशस्त ग्राउंड, झोपण्यासाठी स्वतंत्र सुविधा, जेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था असल्याने मुलांना आनंदात या शिबीराचा लाभ घेता येणार आहे. हे शिबीर महिनाभर असल्याने यामध्ये सहा मिनटाची कुस्ती कशी लढली पाहीजेत, त्यातील नेमके कसब कसे वापरले पाहीजे, याचे नियम काय असतात याची माहिती दिली जाणार आहे.
ग्रामीण भागातील मुलांना मैदानी कुस्ती एवढेच माहीत आहे. मैदानावर पैसे मिळतात या आशेवर मुलं स्पर्धा टाळतात आणी मैदाने पसंत करतात. खऱ्याअर्थाने कुस्तीत करीअर करायचे असेल तर स्पर्धा खेळणे गरजेचे आहे. नेमकी हिच कमतरता ओळखुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरानंतर नक्कीच तुमच्या मुलांमध्येही बदल झालेला तुम्हाला दिसेल यात शंकाच नाही. आपल्या मुलाला काय द्यायचं हे पालकांनी ठरवायचं .दुसऱ्याला विचारुन मुलांचं भविष्य ठरवायचं नाही . तुमचा एक निर्णय तुमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. फक्त निर्णय घेताना मनापासुन घ्यावा.
शिबिरात मिळणार या सुविधा
१)तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य मार्गदर्शन
२)आधुनिक मॅट व प्रशस्त मातीचा आखाडा
३)खेळासंबंधी व्यायाम व आहार विषयी सखोल मार्गदर्शन
४)योगासन प्रात्यक्षिके
५)आंतरराष्ट्रीय नियमांनुसार कुस्ती प्रशिक्षण
६)व्हिडिओ द्वारे कुस्तीच्या डावांचे मार्गदर्शन
७)प्रशिक्षण दरम्यान स्पोर्ट्स किट दिले जाईल.
८)शिबिर पुर्ण करणा-या खेळाडूस प्रमाणपत्र व शिल्ड दिले जाईल.
९) प्रत्येकाला बेड आणि गादी दिली जाईल. शिवाय आंघोळीसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाईल.
१०) पिण्यासाठी शुद्ध अॅक्वाचे पाणी .
११) वैद्यकिय व्यवस्था.
१२) खेळाडूंनी येताना आपले शूज, अंगावर पांघरून, बरमूडा घेऊन येणे.
शिबिराच्या नियम व अटी
@ वय मर्यादा - १० वर्ष ते २० वर्ष
@ प्रशिक्षणादरम्यान मोबाईल वापरण्यास सक्त मनाई आहे .
@ एकदा घेतलेला प्रवेश रद्द करता येणार नाही
@ कोणत्याही कारणास्तव फी परत दिली जाणार नाही.
@ प्रवेश निश्चितीवेळी फी भरणे आवश्यक
@ प्रवेश नोंदणी अंतिम तारीख - ३० एप्रिल २०२२
@ शेवटच्या दिवशी कुस्ती मैदान घेऊन प्रत्येक पैलवानास बक्षीस दिले जाईल.
*👉प्रवेश फी6000 रूपये
प्रमुख मार्गदर्शक
आॅलम्पिकवीर पै.बंडा पाटील मामा
अविनाश धस (सर) योगगुरू भारताला जागतीक करंडक मिळवुन दिले.
आनंदराव धुमाळ (दादा) All India चाॅम्पीयन NIS कुस्ती प्रशिक्षक
पी .आर.पाटील (दादा) IPS अधिकारी
मा.डी.आर.जाधव (आण्णा) उपाध्यक्ष भारतीय कुस्ती महासंघ
श्री आनंदराव माईंगडे (दादा) संस्थापक दत्त सेवा उद्योग समुह
पै.रामदास देसाई (संस्थापक कुस्ती हेच जीवन महाराष्ट्र राज्य)
पै. चंद्रहार पाटील (डबल महाराष्ट्र केसरी)
पै. पृथ्वीराज पाटील (नॅशनल गोल्ड मेडल्स)( महाराष्ट्र केसरी)
पै. दिपक पाटील (दादा) - संस्थापक कानसा खोरा फाउंडेशन
श्री अतुल खेडेकर - न्यु इंडीया ईन्सुरन्स मायक्रो आॅफिस ईंचार्ज
पै. सुरेश जाधव - सुप्रसिद्ध निवेदक
संपर्क :- १) पै. संदीप दळवी - NIS कुस्ती कोच, 8459027466
२) शरद जाधव - जिल्हा संपर्क प्रमुख कु.हे.जी. 9922094933
३) पै.मनोज मस्के- पत्रकार अध्यक्ष कु.हे.जी. शिराळा तालुका 9890291065
४) पै.अशोक सावंत - अध्यक्ष कु.हे.जी.शाहुवाडी 9702984006
५) पै. प्रमोद पाटील - कुस्ती कोच दत्त सेवा विद्यालय 8806482526
६) पै संपत पाटील - उपाध्यक्ष कु.हे.जी. शाहुवाडी 8108150935
७) पत्रकार शिवाजीराव चौगुले 9552571493
स्थळ:- दत्तसेवा विद्यालय तुरुकवाडी या. शाहुवाडी, जि. कोल्हापूर
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
|
0 Comments