शिव न्यूज: बातम्या वाचण्यासाठी फोटोवर क्लिक करा
शिराळा:खुंदलापूर गावाने ४४ वर्षापासून दारूबंदीचा आदर्श जपला आहे.या गावाची ऐतिहासिक नोंद असून गावाने एकोपा जपला असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख यांनी केले.
खुंदलापूर (ता शिराळा) येथे दारूबंदीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी पंचायत समिती माजी सभापती हणमंतराव पाटील, प्रवीण काकडे, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अधिकारी नलवडे, सरपंच बाबुराव गावडे, तुकाराम गावडे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले:- खुदलापूर सारख्या गावाने 44 वर्षापासून एकोपा ठेवून एक ऐतिहासिक दारूबंदीचा निर्णय घेतला गावातील एकही व्यक्ती दारू पीत नाही अगर गावामध्ये दारू पिलेल्या व्यक्तीस प्रवेश दिला जात नाही. असा अलिखित निर्णय झालेला आहे.हे फक्त गावातील एकीमुळे शक्य होऊ शकते.एक आदर्श या गावाचा राज्यासाठी आहे. एखादी वैशिष्ट्यपूर्ण ,आदर्शवत, कौतुकास्पद गोष्ट ही दुर्मिळ स्वरूपामध्ये असते. येथील लोकांचे निरोगी मन व निरोगी शरीर विचाराची रचना पवित्र आहे.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख व शिवाजीराव नाईक यांच्या विचारावर चालत येथील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला आहे. येथील असणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही देशमुख यांनी दिली.
पोलीस पाटील धाकलू गावडे,सीताराम गावडे, जनार्धन गावडे, विक्रम गावडे, नितीन गावडे, कोंडीबा अनुसे, दिलीप सूर्यवंशी,गंगाराम गावडे,नवलू गावडे, बाबू गावडे,जयराम गावडे,महेश गावडे आदीसह या गावातील ग्रामस्थ, युवक मंडळी,महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्राट आमदार होण्याचे नानासाहेबांचे स्वप्न देवेंद्र पूर्ण करतील
--------------------------------------------------------------------------------
तिथला ग्लास मला चालत नाही- देवेंद्र फडणवीस
---------------------------------------------------------------------
0 Comments