शिराळा:महिलांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम शिराळा सखी मंचने केले आहे असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांनी केले.
शिराळा येथील रसिका मल्टिपर्पज हॉल मध्ये सखी मंच शिराळा मार्फत महिलांसाठी आयोजीत केलेल्या "जल्लोष २०२२" या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आपला बझार समूहाच्या अध्यक्षा सुनितादेवी नाईक, होत्या. कार्यक्रमास शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष व शिराळा सखी मंचच्या अध्यक्षा साधनाताई पाटील, डॉ.मिनाक्षी पाटील, रंजनाताई नाईक, जिल्हा परिषद सदस्य अश्विनीताई नाईक, शुभलक्षमी नाईक, दिपाली नाईक, मृणाल नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विराज नाईक म्हणाले, तालुक्यातील महिलांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून शिराळा सुखी मंचच्या माध्यमातून तालुक्यातील महिलांना सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू लागली आहे. महिलांना मनोरंजनासह वेगवेगळ्या माध्यमातून स्वतःच्या कलागुणांना वाव देण्याचे काम सखी मंचच्या माध्यमातून केले जात आहे. आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा तालुक्यातील महिलांसाठी विराज व विश्वास उद्योगसमूहांच्या माध्यमातून हाताला काम व वेगवेगळ्या माध्यमांतून व्यासपीठ मिळवून दिले आहे.
यावेळी सुमित डान्स ॲकॅडमीच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सखी मंचसाठी जास्त महिला सभासद नोंदणी करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक शिराळा सखीमंचच्या अध्यक्षा साधना पाटील यांनी केले. यावेळी कल्पना गायकवाड, डॉ.मिनाक्षी पाटील, वैशाली कदम, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, स्मिता महींद, अर्चना कदम, सुप्रिया पाटील, वंदना यादव, वैशाली भुयेकर, रुपाली कदम, शुभांगी देसाई, वैशाली कदम शिराळा सखी मंचच्या पदाधिकारी. डी.एन.मिरजकर, आर. बी. शिंदे, एस. एम. पाटील उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments