मनात आणले तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. ती साध्य करण्यासाठी असायला हवी अफाट इच्छाशक्ती. त्याच जोरावर एका तरूणाने नोकरीच्या मागे न लागता स्वावलंबी बनण्यासाठी १७ वर्षा पूर्वी केवळ पाच मोबाईलवर सरू केलेल्या साक्षी मोबाईलने आता पाचशे मोबाईलचे शोरूम करून १० जणांच्या हाताला काम दिले आहे. हे यश केवळ मोबाईलची गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार,आपुलकीची सेवा यामुळे शक्य झाले आहे. अशा या प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केलेल्या शिराळा येथील सोमवार पेठेत असणाऱ्या निलेश वसंत उबारे यांच्या "साक्षी मोबाईल" या दुकानाचा आज गुढीपाडव्याला १७ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. त्यानिमित शिव न्यूजने घेतलेला आढावा.......
शिराळा येथील युवक निलेश हे पदवीधर आहेत. त्यांनी नोकरीच्या मागे न लागता छोटा का असेना पण स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यास घरातील लोकांनी साथ दिली. आर्थिक अडचण होतीच. पण व्यवसाय काय करावा हे पहिल्यांदा सुचत नव्हते. त्यावेळी लोकांशी निगडीत असणारा व दिवसेंदिवस नवक्रांती घडवणारा मोबाईल हा एकमेव पर्याय होता. अन्न, वस्त्र,निवारा ह्या माणसाच्या गरजा बनल्या आहेत.त्यात आता मोबाईलची भर पडली आहे. लोकांची ही चौथी गरज ओळखून तोच धागा पकडण्याचे धाडस निलेश यांनी केले. त्यावेळी मोबाईलला चांगली मागणी होती. पण त्या प्रमाणात दुकानांची संख्या कमी होती. हेच लक्षात घेवून निलेशने मोबाईल दुकान सुरु करण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक अडचण असल्याने केवळ पाच मोबाईल आणून दहा बाय दहाच्या जागेत दुकान सुरु केले. निलेश यांचा असणारा जनसंपर्क व मित्र परिवार याच बरोबर ग्राहकांना देत असलेली पारदर्शक व प्रामाणिक सेवा यामुळे देवसेंदिवस ग्राहक वाढू लागले. ग्राहक वाढले तरी मोबाईलची गुणवत्ता, प्रामाणिक व पारदर्शक व्यवहार यात अद्याप तडजोड केली जात नाही. त्यामुळे शिराळा, वाळवा. शाहुवाडी तालुक्यातील ग्राहकांच्या मनात साक्षी मोबाईल एक वेगळे स्थान निर्माण करून आहे.
ग्राहक संख्या वाढू लागल्याने आता दहा लोक या दुकानात काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागला आहे. कायम येणाऱ्या ग्राहकांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने परतावा मिळावा या हेतूने आपल्या नफ्यातून गुढीपाडवा , गणेशोत्सव , दसरा, दिपवाळी, नवीन वर्ष अशा विविध सणांच्या निमित्ताने मोबाईल खरेदीवर आकर्षक भेट वस्तू दिल्या जातात. हेच आपुलकीच नातं जपण्यासाठी शिराळा, वाळवा. शाहुवाडी तालुक्यातील ग्राहक आवर्जून साक्षी मोबाईल मध्ये खरेदी करण्यासाठी हजेरी लावतात.
येथे vivo, oppo, samsung,oneplus, i phone व त्यासाठी आवश्यक असणारे इतर साहित्य उपलब्ध आहे.
साक्षी मध्ये मिळते गुणवत्ता, पारदर्शक व्यवहार,आपुलकीची सेवा | sakshi get quality, transparent dealings, affectionate service
0 Comments