BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

 माजी आमदार शिवाजीराव नाईक यांच्या पक्ष प्रवेशाबद्दल खालील फॉर्म  मध्ये आपले मत नोंदवा
  
आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

राष्ट्रवादी पक्षाचे नेते  व माजी कृषिमंत्री शरद पवार व शिराळचे  भाजपाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रमुख  उपस्थितीत आज मुंबई  येथे यशवंतराव  चव्हाण स्मृति सदन मध्ये  साडे बारा वाजता बैठक झाली. या बैठकीत पक्ष प्रवेशाबद्दल  सकारात्मक चर्चा होऊन त्यावर  शिक्कामोर्तब  झाला. २ एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर  शिराळा येथे होणाऱ्या  शिवाजीराव नाईक यांच्या राष्ट्रवादीपक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास स्वतः उपस्थित राहण्याची तयारी शरद पवार यांनी दर्शवली आहे.  या बैठकीने नाईक यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.  

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

 शरद पवार  व शिवाजीराव नाईक यांची २४ फेब्रुवारी ला होणारी  बैठक अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याने  दिवसभर शरद पवार यांच्या नियोजित बैठका स्थगित केल्या  होत्या. त्यामुळे नियोजित बैठक पुढील आठवड्यात घेण्याचे  ठरले होते. त्यानुसार आज बुधवारी  यशवंतराव  चव्हाण स्मृति सदन मध्ये  साडे बारा वाजता शरद पवार व शिवाजीराव नाईक यांची  बैठक झाली. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, रणधीर रणधीर नाईक, सत्यजित नाईक, अभिजित नाईक उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांची नाईक कुटुंबीयांनी भेट घटली. त्यावेळी नाईक यांच्या निर्णयाचे स्वागत करत एकत्रित काम करून शिराळा विधानसभा मतदार संघाचा आणखी कायापालट कराल अशी अशा व्यक्त केली.  

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

अडचणीत असणाऱ्या संस्थाना उर्जितावस्था आणण्यासाठी राजकारणात दोन पावले मागे जाण्याची तयारी माजी मंत्री शिवाजीराव नाईक दर्शवली असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या चर्चेला गेले महिनाभर उधान आले होते.. मात्र  राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक हे प्रबळ असताना त्यात शिवाजीराव नाईक यांची भर म्हणजे  एकाच म्यानात दोन तलवारी असे असले तरी हा विधानसभा मतदारसंघ हा मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सुरक्षित ठेवत मंत्री जयंतराव पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरु  आहे.  या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल शिवाजीराव नाईक यांनी दुजोरा आणि  नकार  दिलेला नव्हता .  

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

मंत्री जयंतराव पाटील व माजी मंत्री शिवाजीराव नाईक या वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या  नागाचा राजकीय झालेला टोकाचा संघर्ष सर्वज्ञात आहे. काही वेळा प्राप्त परिस्थिती नुसार राजकारणात दोन  पाऊल मागे घ्यावे लागते. सध्या शिवाजीराव नाईक यांच्या संस्था अडचणीत असल्याने त्यांना राजकारणा पेक्षा संस्था महत्वाच्या आहेत. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे व जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक मंत्री जयंतराव पाटील यांच्या हाती आहे. योगायोगाने या बँकेचे अध्यक्षपद हे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे आहे. संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या संधीचा फायदा  शिवाजीराव नाईक यांना होणार आहे.   

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

राजकारणासाठी संस्था आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपवर नाराजी व्यक्त न करता आपल्या संस्था व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजीराव नाईक यांना निर्णय घ्यावा लागला  आहे.. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते आजमावून घेतली आहेत . त्यास कार्यकर्त्यांची ही सकारत्मकता दाखवत   शिवाजीराव नाईक हाच आमचा पक्ष ही भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली असल्याने नाईक यांचा राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

 एकदिलाने काम करा 

आज शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठलीत राजकीय अशी चर्चा काही झाली नाही. आमची ही औपचारिक भेट होती. आपण जुने सहकारी आहोत. तुम्ही आल्यामुळे आम्हाला आणखी बळ मिळाले आहे. मानसिंगराव नाईक व तुम्ही एकदिलाने काम करून मतदार संघाचा आणखी कायापालट करा. पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमास मी स्वतः हजर राहीन असे  आश्वासन त्यांनी  दिले आहे. 

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक  

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

वाढदिवस आणि २ आकड्याचा बोलबाला   

शिवाजीराव नाईक यांचा आज २ मार्चला  वाढदिवस. आज शरद पवार यांच्याशी भेट होऊन त्यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. आणि योगायोगाने २  एप्रिलला गुढीपाडवा या दिवशी पक्ष प्रवेश व त्यात कट्टर विरोधक असणाऱ्या २ नाईकांचे मनोमिलन. सर्व चांगल्या घटनेत २ आकडा लकी असल्याने  या २ चा बोलबाला सुरु आहे.  

आपण पूर्वीचेच सहकारी आहोत. आता दोघ एकदिलाने काम करा- शरद पवार | We are already colleagues, now both of you work together - Sharad Pawar 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments