मांगरुळ (ता. शिराळा ) येथील मांगरुळ विकास सेवासोसायटीच्या अध्यक्षपदी उत्तम दादू मस्के यांची तर उपाध्यक्षपदी किरण साधू खांडेकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विकास माळी यांनी काम पाहिले.
विकास माळी, सोसायटीचे मावळते अध्यक्ष विश्वास शिंदे, निनाई शुगरचे माजी संचालक जे. डी. खांडेकर, 'जुगाईदेवी दुध' संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजाराम मस्के, उपसरपंच सुनंदाताई मस्के यांनी नूतन पदाधिकारी, मावळते पदाधिकारी यांचा सन्मान केला. गावच्या विकासाचे केंद्र 'सेवासोसायट्या' असल्याचे मत मनोगतातून जे. डी. खांडेकर, विश्वास शिंदे, विजयसिंह खांडेकर यांनी मांडले.
राजाराम खांडेकर, संचालक सुनंदाताई मस्के, सुमन खांडेकर, संजय गायकवाड,विश्वास शिंदे, भीमराव मस्के, भीमराव खवरे, भगवान मस्के, राजाराम मस्के, रघूनाथ मस्के, हिंम्मतराव खांडेकर, सेक्रेटरी शिवाजी खोत, चंद्रकांत मस्के, बाबूराव खांडेकर, सुभाष खांडेकर आदींसह सभासद उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

0 Comments