पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
शिराळा: चरण (ता.शिराळा) येथील जबरी चोरीतील संशयित आरोपी शल्मून प्रफुल्ल कांबळे (वय २६) जितेंद्र पवार उर्फ गोल्या ( वय २५ ) रा. इस्लामपूर यांना शिराळा पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. एक संशयित पळून गेला आहे..त्याच्याकडून ३ लाख ६ हजार ८००रुपयांचा मुद्देमाला सह गुन्ह्यात वापरलेली ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त केली आहे जप्त करण्यात आला आहे. हा पाठलाग शिराळा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला.
पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चरण ( ता.शिराळा ) येथे शुक्रवार ता.२५ रोजी रात्री ९:३० च्या दरम्यान संजय आनंदा पुजारी ( वय ५२) यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश करुन संजय पुजारी व नंदा भोसले यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावून जीवे मारण्याची धमकी दिली. संजय यांच्या दोन सोन्याच्या साखळ्या व हातातील दोन अंगठ्या असे ५४ ग्रॅमचे सोने तसेच पॅन्टच्या खिशातील २६ हजार ८०० रूपये असा एकूण ३ लाख ६ हजार ८०० रूपयेचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला . सदरचा गुन्हा घडल्यानंतर तात्काळ माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकरूड ज्ञानदेव वाघ यांना मोबाईलवरती खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पोलीस पथकासोबत घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली.
पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
त्यांना संशयित चोरटे काळया रंगाच्या ॲक्टिवा मोटरसायकलवरून शिराळच्या दिशेने पळून जात असल्याबाबत माहिती मिळाली. त्याप्रमाणे त्यांनी तात्काळ शिराळा, कुरळप व इस्लामपूर हायवे पेट्रोलिंग मोबाईल यांच्याशी संपर्क साधून गुन्ह्याची व आरोपीची माहिती देऊन नाकाबंदीच्या सूचना दिल्या. आरोपीच्या शोध चालू केला. याबाबत संजय पुजारी यांनी कोकरूड पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दाखल केली होती.
पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
यावरून शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्यासह हवालदार चंद्रकांत कांबळे, अमर जाधव , महेश साळुंखे, होमगार्ड एस.एस. मेतुगडे, एम.आर. चव्हाण यांनी मोटारसायकलचा पाठलाग करून संशयित शल्मून कांबळे यास पकडले. यावेळी दोन संशयित आरोपी जितेंद्र पवार उर्फ गोल्या व सोन्या माने (दोन्ही रा. इस्लामपूर) हे पळून गेले. त्या पैकी जितेंद्र पवार उर्फ गोल्या यास इस्लामपूर येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पाठलाग करून चोरटे जेरबंद | Thieves chased and arrested
घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, पोलीस नाईक एम. एस. पांढरे, पोलीस नाईक शिवाजी जाधव, पोलीस हवलदार सुहास डाकवे, एस. पी. पाटील, इमरान रोडे,व्ही.एन.भोसले करत आहेत.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments