मलकापूर : शाहुवाडी तालुक्यातील मानोली धरणानजीक २० मार्च रोजी मिळालेल्या महिलेच्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवून देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून त्यास काही बक्षीस हि देण्यात येईल, अशी माहिती शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.
परंतु हा मृतदेह आपल्या कार्यक्षेत्रातील नसून १०० किलोमीटरच्या परिघातील असावा असा पोलिसांचा कयास आहे.
२० मार्च रोजी आंबा पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मागील बाजूस एका महिलेचा मृतदेह एका पत्र्याच्या पेटीत असल्याचे आढळून आले. याबाबत पोलिसांनी पंचक्रोशीत चौकशी केली आहे.
परंतु या परिसरात कोणतीही बेपत्ता साल्या ची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद नाही.त्यामुळे मृतदेहाची ओळख पटवून देण्याचे आवाहन शाहुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी केले आहे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments