शिराळा :मतदारसंघातील जनतेच्या आणि यशवंत उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचार करून संस्थात्मक बळकटीकरणासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत यापुढे आपण सर्वजण राहू असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
सिद्धेश्वरनगर ता. शिराळा येथील यशवंत ग्लुकोज कारखाना कार्यस्थळावर शिराळा विधानसभा मतदार संघातील शिवाजीराव नाईक गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. रणधीर नाईक सुखदेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना माजी मंत्री शिवाजीराव नाईक म्हणाले, संस्थात्मक अडचणी आल्यामुळे गेली तीन-चार वर्षे यशवंत उद्योगसमूहातील काही युनिट बंद होते. या अडचणीतील संस्था बाहेर काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सहकार्याची भूमिका मिळाली म्हणून मतदार संघातील जनतेच्या आणि संस्थात्मक बळकटीकरणासाठी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह सर्वांनी आपण एकत्र मिळून काम करूया अशी भूमिका घेतली आहे. अडचणीतील संस्थाना उर्जितावस्था देऊन राष्ट्रवादी पक्ष बळकट करण्यासाठी काम करूया असे विश्वासाने सांगितले आहे. म्हणून आपण सर्वजण येणाऱ्या काळात एक दिलाने आणि विश्वासाने समन्वय साधून एकत्रितपणे काम करावयाचे आहे. आजवर मतदारसंघातील जनतेने आणि तुम्ही सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी दिलेले प्रेम, केलेले सहकार्य हे आम्ही कदापि विसरू शकणार नाही.
रणधीर नाईक म्हणाले, अडचणीतील संस्था वाचविण्यासाठी जी मंडळी आपल्याला मदत करीत आहेत त्यांच्या सोबत या पुढे जाण्याचा निर्णय घेत आहोत. याबद्दल गेली दोन महिने गावोगावच्या नागरिकांना भेटून त्यांची मते आजमावून घेतली आणि सर्वानुमते राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय निश्चित केला आहे.
माजी प. स. सदस्य अरविंद बुद्रुक, माजी प. स. उपसभाती प्रल्हाद पाटील, यशवंत दूधचे उपाध्यक्ष नामदेव पाटील, वारणा साखर संचालक विजय पाटील, सतीश जाधव , शहाजी पाटील , मारुतीराव कुंभार, रघुनाथ पाटील, संजय पाटील, बाळासाहेब पाटील, महेश पाटील, रामचंद्र पवार , सागर नाईक, राणा नाईक, राजन पाटील, शुभम गायकवाड, प्रकाश गायकवाड, प्रकाश पाटील, युवराज यादव, नगरसेवक बंडा डांगे, वैभव गायकवाड, नरेंद्र सूर्यवंशी, एन डी लोहार,
प्रकाश जाधव, सचिन यादव, दीपक पाटील, आनंदराव पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता पाटील, संभाजी पाटील, हेमंत मुळीक, वसंत पाटील, गजानन पाटील, एम. के. जाधव, संभाजी पाटील यांच्यासह शिवाजीराव नाईक गटाचे सर्व सरपंच, उपसरपंच, सोसायटी चेअरमन, पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी स्वागत के. वाय. भाष्टे यांनी केले. आभार शरद गुरव यांनी मानले. सूत्र संचालन रमेश गिरी यांनी केले.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments