शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह त्यांच्या ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व पक्ष सदस्यत्वचे राजीनामे दिले आहे. त्यामुळे शिवाजीराव नाईक आपल्या सर्व कार्यकर्त्या समवेत शनिवारी २ एप्रिल रोजी राष्ट्रवादीत कॉंग्रेस पक्षात राष्ट्रवादीतचे नेते शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिराळा येथे राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील यांनी दिली.
येथील यशवंत ग्लुकोज कारख्ण्याच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी पाटील म्हणाले,माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारणी सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सोबत शिराळा तालुका भाजपचे अध्यक्ष सुखदेव पाटील, ओ.बी.सी.सेलचे सांगली जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष शरद गुरव,शिराळा तालुका युवा मोर्चा अध्यक्ष सागर नाईक, सांगली जिल्हा युवा मोर्चा उपाअध्यक्ष पांडुरंग गायकवाड, वाळवा पश्चिम मंडल अध्यक्ष सी.एच. पाटील
यांच्यासह १४ सेल व १३ आघाड्याच्या सर्व पदाधिकारी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. यामध्ये ३३४ बूथ केंद्र,८४ शक्ती बूथ केंद्राच्या सर्व पदाधिकारी व शिराळा तालुक्यातील २७ सरपंच २१९ ग्रामपंचायत सदस्य व वाळवा तालुक्यातील १७ सरपंच व १३७ ग्रामपंचायत सदस्य यांनी ही पक्ष सदस्यत्वाचे राजीनामे दिले आहेत.
यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक, सागर नाईक,उत्तम पाटील, पांडुरंग गायकवाड,विजय महाडिक,शरद गुरव, उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments