शिराळा:शनिवारी २ एप्रिल रोजी शिराळा येथे खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या पक्ष प्रवेश व शेतकरी मेळाव्यात मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन होणार आहे. शिराळा विधासभा मतदार संघात सध्या राष्ट्रवादी नंबर एक आहे. शिवाजीराव नाईक यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची आणखी ताकद वाढणार आहे. हीच वाढलेली ताकद मेळाव्याच्या निमित्ताने शक्ती प्रदर्शनातून दाखवली जाणार आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात मंडप उभारणी करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत जलसंपदामंत्री जयंतराव पाटील यांनी वाकुर्डे योजनेस ३०० व वारणा कालव्यासाठी ३०० कोटी आणि वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी ५४ अशा एकूण ६५४ कोटी निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांचा शिराळा विधानसभा मतदार संघाच्यावतीने भव्य नागरी सत्कार होणार आहे. भाजपाचे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत काॅंग्रेस पक्षात पक्ष प्रवेश होणार असून त्या अनुषंगाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन नाईक एकत्र आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद शिराळा मतदार संघात अधिक वाढणार आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायतीसह ग्रामपंचायत निवडणुकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड होणार आहे. शिराळा येथील श्री शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर शनिवारी सकाळी साडे नऊ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून आमदार मानसिंगराव नाईक, विराज नाईक, अमरसिंह नाईक. राजेंद्रसिंह नाईक, सम्राटसिंह नाईक, भूषण नाईक , माजी आमदार शिवाजीराव नाईक, रणधीर नाईक व त्यांचे सर्व प्रमुख कार्यकर्ते शिराळा विधानसभा मतदार संघात बैठका घेवून लोकांशी संवाद साधला आहे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments