BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

प्लास्टिक बंदी कार्यशाळा | Plastic ban workshop

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 प्लास्टिक बंदी कार्यशाळा | Plastic ban workshop


 प्लास्टिक बंदी कार्यशाळा Plastic ban workshop



शिराळा : शिराळा नगरपंचायत मार्फत   व्यापारी व नागरिकांच्यासाठी प्लास्टिक बंदी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेस  व्यापरी वर्गाचा चांगला  प्रतिसाद मिळाला. इस्लामपूरचे पर्यावरण विषयाचे प्राध्यापक विनायक साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.

 प्लास्टिक बंदी कार्यशाळा Plastic ban workshop

 

केंद्रीय व राज्य शासनाच्या प्लास्टिक वापर व बंदीबाबत निर्गमित करण्यात आलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचना नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या हेतूने शिराळा नगरपंचायतीच्यावतीने व्यापारी असोसिएशन सभागृह येथे व्यापारी व  नागरिकांसाठी प्लास्टिक वापर बंदी विषयक जनजागृती करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  

 प्लास्टिक बंदी कार्यशाळा Plastic ban workshop

 

यावेळी  नगराध्यक्ष प्रतीभा पवार, मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, सुनिता निकम, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विश्वास कदम, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अमोल पारेख, सदस्य दस्तगीर अत्तार, सुनील कदम, शफी मुल्ला  उपस्थित होते.

 प्लास्टिक बंदी कार्यशाळा Plastic ban workshop

 

       मुख्याधिकारी  योगेश पाटील यांनी शिराळा शहरातील प्लास्टिक बाबतची सद्यस्थिती, प्लास्टिक बंदीची गरज याबाबत माहिती दिली.शिराळा नगरपंचायत मार्फत कचरा व्यवस्थापन करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना यांचा हि आढावा घेतला. ओल्या कचऱ्यावर  करण्यात येत असलेल्या खत निर्मिती प्रकल्प, सुक्या कचऱ्यावर येत असलेले वर्गीकरण व प्लास्टिक व्यवस्थापन करण्याच्या हेतूने इपीआर अंतर्गत शहरातील साधारणत: ९ ते १० टन झालेली विक्री याचाही आढावा घेतला . विशेषत: प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करीत असताना राबविलेल्या उपाययोजना व नगरपंचायतीला  आलेल्या अडचणींची माहिती दिली. सध्या प्लास्टिक बंदींची अंमलबजावणी करीत असताना नागरिकांकडून कोणत्याही प्रकारचा हेतुपूर्वक दंड वसूल करण्यात आला नसून सदभावनापूर्वक केवळ सापडलेल्या प्लास्टिकची जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचा माहिती मुख्याधिकार्यानी दिली. ७५ मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या सिंगल युज प्लास्टिकची विक्री व वापर पूर्णत: टाळून सहकार्य करावे असे आवाहन  केले. 

 प्लास्टिक बंदी कार्यशाळा Plastic ban workshop


  

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments