शिराळा: नव्याने पहिलीत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळापूर्व तयारी अभियानाची शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हापरिषद शिक्षक व अंगणवाडी सेविका यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन केंद्रप्रमुख धोंडीराम गोसावी यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद संचलित व जिल्हा परिषद डायट आणि पंचायत समिती प्रकल्पांतर्गत आयोजित प. त. शिराळा केंद्रातील शिक्षक प्रशिक्षणात बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्र मुख्याध्यापक प्रताप कांबळे होते.
यावेळी जिल्हा तज्ञ मार्गदशीका मनिषा कुरणे म्हणाल्या , पहिलीत नव्याने दाखल होणारा दाखल पात्र विद्यार्थी सक्षम होण्यासाठी या उपक्रमांची शंभर टक्के अंमलबजावणी शाळा पातळीवर झाली पाहिजे यासाठी अंगणवाडी व जि.प. शाळेतील शिक्षकांनी एकसंघपणे राहुन काम करावे.
या प्रशिक्षणात मार्गदर्शक ज्योती पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पीपीटीचे सादरीकरण झाले. राजकुमार पाटील, अनंत सपकाळ, कृष्णा सावंत, अशोक घागरे, शांताराम तराळ, विवेक पवार, अशोक शेवाळे,बाबासो वरेकर , रविंद्र सातपुते, यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी शाळा पूर्वतयारी अभियान शैक्षणीक स्टॉलचे उद्घाटन केंद्रप्रमुख डी .के .गोसावी यांचे हस्ते करणेत आले व त्याचे शाळानिहाय सादरीकरण केले. प्रास्ताविक मनिषा कुरणे, यांनी केले. आर .सी. पाटील .यांनी आभार मानले. संयोजन महादेव हावलदार यांनी केले . या कार्यशाळेस सर्व केंद्रातील सर्व शिक्षक, शिक्षीका,अंगणवाडी सेवीका, उपस्थित होत्या.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments