शिराळा: महाशिवरात्री निमित्ताने शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथ मंदिरात मठाधीपती पीर योगी पारसनाथजी महाराज यांनी महाअभिषेकचे आयोजन केले होते. हा अभिषेक खाजदार संजय काका पाटील वसांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
गोरक्षनाथ मंदिरात महाअभिषेकचे आयोजन | Mahaabhishek organized at Goraksanath temple
गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्यासाठी खाजदार संजय पाटील यांनी महाप्रसाद म्हणून खिचड़ीची, मंदिरात लागणाऱ्या फुलांची सोय सत्यजीत देशमुख यांनी, टँकर द्वारे थंड पिण्याच्या पाण्याची सोय आमदार विनय कोरे यांनी केली होती. येथील गोरक्षनाथ मंदिर हे प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाते. एकादशी दिवशी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातून लोक नाथांच्या दर्शनासाठी येतात.
गोरक्षनाथ मंदिरात महाअभिषेकचे आयोजन | Mahaabhishek organized at Goraksanath temple
यावेळी मठाधिपती पारसनाथजी महाराज, आनंदनाथजी महाराज, स्वप्निल निकम,विश्वास कारखान्याचे संचालक बंडा कदम, माजी पंचायत समिती सभापती हणमंत पाटील, वारणा कारखान्याचे संचालक विजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य के..डी.पाटील उपस्थित होते.
गोरक्षनाथ मंदिरात महाअभिषेकचे आयोजन | Mahaabhishek organized at Goraksanath temple
यावेळी खाजदार संजय काका पाटील म्हणाले की शिराळा येथील महायोगी गोरक्षनाथाचा महिमा अपरंपार असून नाथ महाराज यांच्या मुळेच शिराळ्याची नागपंचमी संपूर्ण जगभरप्रसिद्ध आहे. हे स्वज्ञात असताना ही नाथांची माहिती व महिमा म्हणावे तसा सर्व लोकांपर्यत पोहचला नाही .यासाठी नाथ महाराजांची विस्तृत माहिती एकत्र करून लवकरच एक माहितीपट करावा लागेल.
गोरक्षनाथ मंदिरात महाअभिषेकचे आयोजन | Mahaabhishek organized at Goraksanath temple
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments