शिराळा :फत्तेसिंगराव नाईक ( आप्पा ) सहकारी दूध उत्पादक संघाने २१ मार्च पासून गाय दूध खरेदी दरासाठी प्रती लीटर २.00 रूपये वाढ केली असल्याची माहीती संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक यांनी दिली .
यावेळी नाईक म्हणाले , शेतकरी दूध उत्पादकासाठी दूध खरेदीस रास्त भाव देण्याची संघाची नेहमी आग्रही भूमिका असते . योग्य वेळी दरामध्ये वाढ दिल्यामुळे दूध उत्पादन करणा - या शेतकरी उत्पादकांच्या नफा वाढीमध्ये समतोल साधला जातो. यासाठी आमदार मानसिंगराव नाईक संचालक मंडळाला नेहमीच सुचना व मार्गदर्शन करत असतात.
संघाच्या मुंबईतील शाखेचे बांधकाम जलद गतीने सुरू असून लवकरच शुभारंभ होईल . येथील शाखेच्या माध्यमातुन दूध संघास पुरवठा करणा - या दूध उत्पादकास अधिकच फायदा देता येणार आहे . संकलन , वितरण व पचिती दूग्ध पदार्थ विक्रीस बळकटी मिळणार आहे . सभासदांच्या संस्थेवरील विश्वास व पाठींब्यामुळेच संघाच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू होत आहेत.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष प्रकाश धस , संचालक संजय पाटील, श्रीरंग भोसले, बबन पाटील , अनिल पाटील , मानसिंग पाटील , शिवाजी यमगर , शिवाजी लाड ,सुर्यकांत चिंचोलकर , गणेश पाटील , माणिक दशवंत , रामचंद्र पाटील , लक्ष्मण पाटील , मानसिंग पाटील , संजय पाटील , मंगला पाटील , शोभा संकपाळ , मनिषा यादव , व्यवस्थापक दिनकर नायकवडी , कार्यकारी संचालक रविंद यादव उपस्थित होते .
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments