शिराळा:राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुढी पाडव्याला (ता. २) रोजी शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितित सत्कार समारंभ, पक्षप्रवेश व शेतकरी मेळावा हजारोंच्या उपस्थितीत व दिमाखदार पद्धतीने पार पडेल, अशी माहिती सांगली जिल्हा मध्यवर्ती बेँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
तयावेळी नाईक म्हणाले, खासदार पवार यांच्या उपस्थितीत वारणा डावा प्रकल्पासाठी रु. ३०० कोटी रुपये, वाकुर्डे बु।। योजनेस ३०० कोटी रुपये व वारणा धरण गळती प्रतिबंधात्मक उपाय योजनांसाठी ५४ कोटी रुपये अशी एकूण 654 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातून जलसंपदा विभागामार्फत केल्याबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील यांचा नागरी सत्कार होणार आहे. राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचा त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत भाजमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाबद्दल स्वागत समारंभ व यानिमित्ताने भव्य शेतकरी मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आहेत तर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत असणार आहेत.
पुणे पदवीधर मतदार संघाचे आमदार अरुणअण्णा लाड, आमदार सुमनताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मा. अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, फतेसिंगराव नाईक (आप्पा) सह. दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंह नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य रणधीर नाईक, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुश्मिता जाधव, राष्ट्रवादी काँग्रसेच तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकध्यक्ष साधना पाटील उपस्थित असणार आहेत.
मेळावा शिराळा येथील शिवछत्रपती विद्यालयाच्या पटांगणावर सकाळी साडेनऊ वाजता सुरू होईल. आमदार नाईक म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे कुशल नियोजन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष विस्तारत आहे. विकासात्मक कामे करण्यात महाविकास आघाडी सरकार अग्रेसर आहे. विरोधकांकडून राज्यातील शेतकरी व कष्टकऱ्यांचे हित जोपासणारे सरकार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्रातील सत्तेचा व यंत्रणांनाचा वापर केला जात आहे, पण पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सातत्याने शिराळा विधानसभा मतदार संघावर प्रेम केले आहेत. विकासासाठी निधी देण्यात सातत्याने झुकते माप दिले आहे. म्हणून त्यांचा सत्कार कार्यकर्त्यांच्या व मतदार संघातील जनतेच्या दृष्टीने महत्वाचा आहे.
ते म्हणाले, सांगली जिल्ह्यात किंबहुना शिराळा विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष म्हणुन ओळखला जातो. आता भाजपामधून ज्येष्ठ नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत प्रवेश करत आहेत. त्यामुळे मतदार संघात पक्षाची ताकद आणखी वाढणार आहेत. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणूकात फायदा होणार आहेत. नाईक यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा जिल्ह्यात पक्षाला होईल. या निमित्ताने होणाऱ्या शेतकरी मेळाव्यास खासदार शरद पवार शेतकरी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. तरी या स्वागत, सत्कार समारंभास व शेतकरी मेळाव्यास मतदार संघातील शेतकरी, माता-भगिनी, युवक मित्र व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments