BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

  ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

शिराळा:-मुली व महिलांच्या आरोग्यासाठी विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागातील महिला सबलीकरणासाठी काम करणार आहे.  त्यांच्या  आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्यदायी योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास फाउंडेशनच्या  अध्यक्षा अद्वितेशा बिर्ला यांनी केले.

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

      शिराळा रेड येथे निनाईदेवी शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत यशस्विनी फाउंडेशन व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उजास फाउंडेशन यांच्यावतीने जागतिक महिला दिनी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी यशस्विनी फाऊंडेशनच्या अध्यक्षा रेणुकादेवी देशमुख होत्या.  सहसंस्थापक साईतेजस्वी देशमुख प्रमुख उपस्थित होत्या. 

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

    यावेळी  अद्वितेशा बिर्ला म्हणाल्या ,ग्रामीण भागातील मुली व महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. शिराळा ग्रामीण व दुर्गम भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन या तालुक्यातील मुली व महिलांच्या आरोग्याबाबत काळजी व त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम आम्ही करणार आहोत. 

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

साईतेजस्वी देशमुख म्हणाल्या, या विभागातील महिलांना कष्ट करून आपले कुटुंब सांभाळावे लागते. अशा परिस्थितीत महिला व मुलींना असणारे वेगवेगळे आजार लपवले जातात .याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे अनेक अडचणी त्यांच्या समोर निर्माण होत असतात. ही बाब लक्षात घेऊन व यशस्वीनी फाउंडेशन यांनी महिलांसाठी काम सुरू केले आहे. यापुढील काळात महिलांच्या आरोग्यविषयक सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

 रेणुकादेवी देशमुख म्हणाल्या,  स्त्रियांच्या आरोग्य, सामाजिक व आर्थिक अशा सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण व डोंगरी भागातील मुली व महिलांच्या अज्ञान व संकोच दूर करून त्यांना योग्य मार्गदर्शन करणार आहोत. यासाठी आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट उजास फाउंडेशन व यशस्विनी फाउंडेशन एकत्र काम करत आहे. आरोग्यविषयक मार्गदर्शन व  उपाययोजना करणार आहोत.यावेळी प्रियदर्शनी हिंगे उपस्थित होत्या. या कार्यक्रमास तालुक्यातील सर्व शाळांची विद्यार्थी,महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 ग्रामीण भागात महिला सबलीकरणासाठी आणि आरोग्यदायी योजना राबविणार | Implement health schemes for women empowerment in rural areas

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments