SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
साक्षी मोबाईल शिराळा
विश्वासचं अतुट नातं
कोकरूड : लोकनेते आमदार स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा परिषद सांगली व पंचायत समिती शिराळा यांच्यावतीने कोकरूड (ता.शिराळा ) येथील जिल्हा परिषद शाळा कोकरूड या ठिकाणी बुधवार २३ मार्च रोजी सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबिराचे आयोजन केले आहे.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
या शिबिरामध्ये प्राथमिक तपासणी पासून मोफत औषधे आणि आवश्यक शस्त्रक्रिया ही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, जिल्हा परिषदेचे सदस्य संपतराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
प्रो.प्रा. अतुल चं पारेख
अल्पावधीत ग्राहकांनी गौरविलेले सौ.सुलभा भाभी यांचे दुकान
या शिबिराचे उदघाटन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सत्यजित देशमुख,मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र हुडी, जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ताताई कोरे, उपाध्यक्ष दिलीप माने, आरोग्य सभापती आशाताई पाटील यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
आयुष्यमान भारत योजना अंतर्गत स्वस्थ सुरक्षा विमा योजनेचा प्रचार व प्रसिद्धी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत नोंदणी, तपासणी उपचार ,स्त्रीरोग ,बालरोग ,नाक-कान-घसा, दंतरोग, हृदयरोग, त्वचारोग, मधुमेह,अस्थिरोग ,वैद्यकीय शास्त्र, प्रजनन संस्थेचे आजार इ. रोगांची तज्ञ डॉक्टर कडून तपासणी व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
तपासणीनंतर रुग्णास संपूर्ण दिवसांचा मोफत औषध उपचार,तपासणी नंतर शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास मोफत संदर्भसेवा आयुर्वेद होमिओपॅथी औषध पध्दतींचा मोफत औषध उपचार ,कॅन्सर विषयक तपासणी व मार्गदर्शन हिवताप, कुष्ठरोग, क्षयरोग, अंधत्व, एच. आय. व्ही .एड्स इत्यादी विषयक तपासणी व उपचार तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थित करण्यात येणार आहे.तरी या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आरोग्य शिबीर| Health camp in memory of late Shivajirao Deshmukh
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
वेध स्थानिक घडामोडींचा
जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
0 Comments