BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

शिराळा : साखरेची  आधारभूत किंमत वाढल्याशिवाय शेतकऱ्याना त्यांच्या  उसाला अपेक्षित असणारा  दर मिळणार नाही.  शहरातील  लोकांना चार पैसे साखर महाग मिळाली तरी चालेल  पण  शेतकऱ्यांच्या  घामाचे दाम  त्यांना चांगले मिळाले  पाहिजे, यासाठी सर्व शेतकरी केंद्र शासनाकडे अपेक्षेने पहात असल्याचे प्रतिपादन विश्वासराव नाईक सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. 

साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक  | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

 चिखली (ता. शिराळा )  येथे विश्वासराव नाईक कारखान्याच्या २०२१-२२च्या गळीत हंगाम सांगता समारंभ प्रसंगी  बोलत होते. कार्यक्रमास उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवक राष्ट्रीवादीचे  जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांची  प्रमुख उपस्थिती होती. 

साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक  | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

    यावेळी नाईक म्हणाले, गेली तीन वर्षे  साखरेची आधारभूत किंमत वाढावी यासाठी देशातून केंद्र शासनावर दबाव असताना व  देशाच्या निती आयोगाने शिफारस करूनही केंद्राच मंत्रीमंडळ निर्णय घेत नाही. त्यामुळे शेतकर्यांना अपेक्षित दर  मिळत नाही. तो मिळण्यासाठी आधारभूत किंमत ही प्रती क्विंटल ३६०० ते ३७०० रुपये असली पाहिजे.  

साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक  | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

 विश्वास कारखाना आर्थिक शिस्त पाळून जास्तीत जास्त गाळप करून शेतकर्यांच्या फायद्यासाठी इथेनॉलच्या नव्या धोरणाचा अवलंब करणार आहे. कमी कालावधीत जास्त  गाळप करून जास्त साखर उत्पादन घेणे  गरजेचे  आहे. त्यासठी गाळप  क्षमता वाढवणार आहे. कारखान्याच्या डिस्टलिरीची आणखी क्षमता नजीकच्या काळात प्रती दिनी ७५ ते  १ लाख लिटर पर्यंत  करणार आहे. याबरोबरच ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर  भर देणार आहे. या दृष्टीकोनातून नियोजन सुरु आहे. यावर्षी कमी कालावधीत जास्त गाळप केले आहे. यावर्षी  एकूण  ५ लाख ८२ हजार ८८२ मे. टन ऊस गाळप केले  आहे. यातून साखर निर्मिती ६ लाख ५७ हजार ५००  क्विंटल झाली आहे. साखरेचा उत्तारा १२.६७ एवढा पडला आहे. 

साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक  | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

यावेळी संचालक दिनकरराव पाटील,विजयराव  नलवडे, सुरेशराव  चव्हाण, बाबासो पाटील ,सुरेश पाटील,विश्वास  कदम ,राजाराम पाटील ,यशवंत निकम, संभाजी पाटील,शिवाजीराव पाटील, विष्णू पाटील,अजितकुमार पाटील, हंबीरराव पाटील,यशवंत दळवी तुकाराम पाटील, बाळासो पाटील, संदीप  तडाखे,कोंडीबा चौगुले, सुहास  पाटील ,बिरु आंबरे ,सुकुमार पाटील, आनंदा  पाटील ,दत्तात्रय पाटील, कार्यकारी संचालक राम पाटील, सचिव सचिन पाटील,  युवराज  गायकवाड  उपस्थित होते. विश्वास पाटील यांनी आभार मानले.

 साखरेची किंमत वाढली तरच उसाला अपेक्षित दर- आमदार मानसिंगराव नाईक  | Expected price of sugarcane only if the price of sugar goes up- MLA Mansingrao Naik

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments