BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात व्यवसाय भुईसपाट | Business leveled off in an instant by a leopard attack

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL
बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट | Business leveled off in an instant by a leopard attack

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack

शिराळा  :उपवळे  (ता. शिराळा ) येथील संकेत सुनील पाटील यांच्या बंदिस्त शेळी पालन मधील  १५  कोंबड्या व  १४ शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारले. जवळपास  पाच लाखांचे  नुकासन झाले आहे. १४ पैकी चार शेळ्या गायब आहेत. यामुळे पाटील कुटुंबियांचा शेळीपालन मध्ये एक शेळी अथवा कोंबडी शिल्लक राहिली नसल्याने त्यांचा हा  व्यवसाय पूर्णतः उध्वस्त झाला आहे. बिबट्याने हा हल्ला सहा फुट उंच असणाऱ्या तारेच्या जाळीच्या कुंपणावरून  आत उडी मारून केला आहे. 

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack
 
ही घटना सोमवारी  मध्यरात्री घडली. याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी, संकेत पाटील यांनी    उपवळे येथील पाटील वस्तीवर तीन वर्षापूर्वी बंदिस्त शेळीपालन केले आहे. त्यांच्याकडे साधारण  ३५ ते ४० हजार  रुपये किमतीच्या  भोर जातीच्या १४ शेळ्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांनी  १५  गावठी कोंबड्यांचे  पालन ही केले होते. संकेत नेहमी प्रमाणे शेळ्यांना व कोंबड्यांना चार व खाद्य घालून सोमवारी सायंकाळी घरी गेले. आज मंगळवारी सकाळी शेडकडे आले असता त्यांना शेडच्या बाहेर चार शेळ्या मृतावस्थेत आढळून आल्या. गेट उघडून आत पाहिले असता त्यांना आत सहा शेळ्या व  कोंबड्या मृतावस्थेत आढळल्या. त्या नंतर  ही माहिती संकेत पाटील यांनी वन विभागाला दिली. त्यावेळी वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक  हणमंत पाटील, वन कामगार संतोष कदम यांनी घटनास्थळी भेट दिली. त्या नंतर पंचनामा करण्यात आला. यावेळी सरपंच सुनील गायकवाड, पोलीस पाटील अजित पाटील, बाबासो पाटील, प्रतिक पाटील,रणजीत पाटील,राहुल पाटील, अक्षय कदम, राहुल कदम उपस्थित होते. 

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack
 
व्यवसाय एका क्षणात  भूईसपाट

संकेत पाटील या युवकाने बी.सी.एस. केले आहे. त्याने  नोकरीच्या  पाठीमागे न लागता स्वावलंबन जीवन जगण्यासाठी तीन वर्षापूर्वी बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरु केला. या  व्यवसायात त्याचा  चांगला  बस  बसला  असतानाच  बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  भूईसपाट झाला. पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack
जाहिरात 

 नेमके बिबटे किती ?

पाटील यांनी या  परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने संरक्षणासाठी शेडच्या सभोवती सहा फुट उंचीचे जाळीचे  कुंपन  केले आहे. त्याच्यावरून आता उडी मारून आतील शेळ्या कोंबड्या फस्त केल्या. तर वजनाने थोड्या कमी असणाऱ्या चार शेळ्यांना  कुंपणावरून  उडी मारून  कुंपणा बाहेर आणल्या आहेत. त्यामुळे एवढे अवघड काम एकटा  बिबट्या करू शकत नाही. त्यामुळे हा हल्ला एका पेक्षा जास्त बिबट्यांनी केला असावा असा अंदाज व्यक्त केला जात  आहे.

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack
जाहिरात 

बिबट्याचे ठसे आढळले 

त्या परिसरात एका बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. शेड परिसरात मातीचा फुफाटा जास्त नसल्याने व तो भाट टणक असल्याने  आणखी ठसे आढळून आले नाहीत- वनक्षेत्रपाल सचिन जाधव

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack
जाहिरात 

तीन  महिन्यात चार  घटना 

८ डिसेंबर २०२१ ला   कापरी येथे  बिबट्याच्या हल्ल्यात  रेड  येथील सुभाष तुकाराम तांदळे या  मेंढपाळाची  २० कोकर ठार तर चार गायब  झाली  होती. १७ डिसेंबर २०२१ ला फकिरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवाप्पा रामा लवटे या मेंढपाळाच्या पाच  मेंढ्या जागीच ठार झाल्या होत्या. ११ जानेवारी २०२२ ला शिराळा येथील खंडागळे यांच्या शेतात  खेड  येथील  सचिन सदाशिव माने, चंद्रकांत भिमराव वगरे, शंकर बापू कोळेकर, जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे यांच्या  मेंढराच्या  कळपावर   दोन बिबट्यानी  हल्ला करून  सहा मेंढराची कोकर  ठार तर सहा जखमी केली होती. पुन्हा आज १० शेळ्या वर व १५ कोंबड्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. तर चार शेळ्या गायब आहेत. 

बिबट्याच्या एका हल्ल्याने क्षणात  व्यवसाय भुईसपाट Business leveled off in an instant by a leopard attack

हे ही वाचा -कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात  २० कोकर ठार तर चार गायब 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments