शिराळा : मराठी वर्षांरंभास राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेली नेते मंडळी व कार्यकर्त्यीची राष्ट्रवादीत घरवापसी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत शिराळा तालुक्यात गुढी उभारून त्याचा जणू मुहूर्त होत आहे. येथे सुरू झालेली घरवापसीच्या नांदीचे चित्र जिल्हाभर किंबहुना राज्यभरात आगामी काळात निर्मिण व्हावे, असा विश्वास सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, पवार यांचा राजकीय प्रवास संघर्षमय झाला आहे. गुरू व भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचाराचा वारस त्यांनी जपला आहे. पुरोगामी विचार व आचारांची कास धरुन बदलत्या काळानुरूप स्वतःमध्ये बदल करत आले आहे. त्याच्याकडील दृष्टेपणा, दूरदृष्टी, अविश्रांत काम करण्याची पद्धत, मुत्सद्देगिरी, नियोजन व अचुक अंदाजाची चमक वयाच्या ८१ व्या वर्षीही कायम आहे. त्याची झलक महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवून त्यांनी दाखवून दिली आहे. म्हणूनच पवार यांच्या कर्तृत्वाचा दरारा देशभर असल्याने शेतकरी, कष्टकरी व सर्वसामन्यांच्या विकासाचे पाईक म्हणून त्यांच्या नेतृत्वाकडे पाहिले जाते.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे काम राज्यभर सुरू आहेत. पक्षसंघटन मजबूत कसे होईल, यावर त्यांचा अधिक भर आहे. विकासाला प्राधान्य देवून ते काम करत आले आहेत. अर्थ व नियोजन, ग्रामविकास, गृह, जलसंपदा खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी वेळावेळी नाविण्यपूर्ण व विकासात्मक काम केले आहे. त्यांच्याकडे कोणतेही खाते असो, त्यांनी नेहमी शिराळा विधासभा मतदार संघाला निधी वाटपात झुकते माप दिले आहे. मी शिराळा मतदार संघाचा दुसऱ्यांदा आमदार म्हणून कार्यरत आहे. या काळात जेवढी विकासकामे झाली, त्यात पाटील यांचा मोठा वाटा आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून त्यांनी महत्वाकांशी वाकुर्डे बुद्रूक योजना व वारणा डावा प्रकल्प, वारणा मुख्य प्रकल्पास ६५४ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यासाठी त्यांचा पक्षाचे अध्यक्ष पवार यांच्या हस्ते नागरी सत्कार होत आहे.
आमदार नाईक म्हणाले, १९९५ ला एकत्र येवून काही काळानंतर पुन्हा वेगळे झालेले माजी बांधकाम राज्यमंत्री शिवाजीराव नाईक पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. या माध्यमातून नाईक मंडळी पुन्हा एकत्र येत आहेत. त्याचा फायदा शिराळा मतदार संघात किंबहूना जिल्हाभरात पक्ष वाढीस होणार आहे.त्यांच्या प्रदिर्घ राजकीय वाटचालीतील अनुभवाचा फायदा पक्षाला, कार्यकर्त्यांना निश्चित होईल. त्यांचा एकूणच प्रवास संघर्षमय झाला आहे. ते मुळचे पुरोगामी विचारसरणीत घडलेले नेतृत्व आहेत. आता उर्तरार्धात ते पुन्हा सर्वसामान्यांच्या विकासासाठी झटणाऱ्या व परोगामी विचारसरणीशी बांधिल असाणाऱ्या शरद पवार, प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत, याचा सर्वांना आनंद आहे.
राज्यातील महाआघाडी सरकार सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसह सर्व घटकांना सामावून घेत त्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. सुरू असलेला विकासाचा धडाका विरोधकांना बघवेना, म्हणून राज्यातील सर्वांचे हित जोपासणारे महाआघाडी सरकार पाडण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी केंद्रातील सत्तेचा व यंत्रणांनाचा वापर केला जात आहे. पवार विरोधकांचे मनसुबे यशस्वी होऊ देणार नाही याची खात्री आहे. महाआघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पुर्ण करेल, यात शंका नाही. राज्यात पुन्हा शरद पवार यांच्या विचारांचे सरकार स्थापन होईल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते राज्यभर कंबर कसून कामाला लागले आहेत.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments