BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच करमाळ्याची आर्ची | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

सैराट चित्रपटातील आर्ची ही मुलाच्या प्रेमात पडून प्रसिद्धीच्या झोतात आली आणि तिच्या नावाचा अजून सर्वत्र बोलबाला सुरु आहे. पण पोटच्या आपल्या मुलीच्या प्रेमापोटी आपल्या आयुषाच्या खडतर वाटेकर आलेल्या  सर्व अडचणीवर मात करत   आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आपल्या शिराळा तालुक्यातील करमाळेच्या या  खऱ्या जीवनपटाची नायिका असणाऱ्या आर्ची ची कहाणी ही इतरांच्या  आयुष्याला कलाटणी देणारी आहे.  

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

सुखी संसार अवघ्या तीन वर्षात संपुष्टात आला असताना केवळ आपल्या चिमुकलीसाठी जीवाचं रान करून शिक्षणातून आपलं आयुष्य बदलण्याची किमया करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अर्चना हंबीरराव पाटील यांची कहाणी चित्तथरारक आहे. वैवाहिक जीवनात अपयशी ठरणाऱ्या अनेक महिलांच्यासाठी ही करमाळ्याची "आर्ची" उध्वस्त जीवन समृद्ध बनवणाऱ्या खऱ्या जीवनाच्या चित्रपटातील नायिका  म्हणावी लागेल.

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

 शिराळा तालुक्यातील करमाळे येथील अर्चना पाटील ह्या उपनिरीक्षक म्हणून सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव ता.हातकणंगले येथे कार्यरत आहेत.२००९ साली महाविद्यालय शिक्षण घेत असतानाच त्यांचा विवाह मुंबई स्थित युवकाशी  झाला.पण त्यांना अवघ्या तीन वर्षांचे वैवाहिक जीवन लाभलं. त्याच वेळी सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला.सुरूवातीचे काही दिवस चांगले सुरू असतानाच , कौटुंबिक वाद वाढत गेला आणि पुढे त्याचे रूपांतर विभक्त होण्यात झालं.व्यसन, कौटुंबिक हिंसाचार यामुळे त्या माहेरी निघून आल्या.  सोबत चिमुकलीला सुद्धा घेऊन आल्या. माहेरी आल्यानंतर त्यांनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. इस्लामपूर येथील .कुसुमताई राजारामबापू पाटील..या महाविद्यालयातून त्यांनी विज्ञान शाखेतून पदवी घेतली आणि लगेचच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. या वेळेस ग्रामीण भाग असलेने सुरवातीला विरोध झाला.एकटी राहणे मुलीची जबाबदारी  हे जेवढं वरून दिसतंय एवढं सोपं मात्र अजिबात नाही.याकाळात मुलीला आईजवळ ठेवून सकाळी ७:०० वाजता  एस टी ने  कर्मवीर प्रबोधिनी इस्लामपूर या ठिकाणी जाणे व रात्री ७:००च्या एसटीने घरी परत असा त्यांचा  संघर्ष सुरू होता.

 खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

जड अंतःकरणाने त्यांनी एक एक पाऊल पुढे टाकत स्वावलंबनाकडे प्रवास सुरू ठेवला.स्पर्धापरीक्षेत सुरूवातीला अपयश आले.  पण त्यांनी हार न मानता जिद्दीने संघर्ष सुरू ठेवला आणि अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले   २०१८ मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली.

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

 त्यांचा प्रवास संघर्षातून समृद्ध जीवनाकडे सुरू झाला.१४ महिन्यांचे प्रशिक्षण पुर्ण करुन, २०२० पासून त्या पेठवडगाव येथे कार्यरत आहेत.  आयुष्यात आलेल्या वाईट वेळेवर मात करून त्या आत्ता स्वावलंबी आयुष्य जगत आहेत . पेठवडगाव येथे कार्यरत असताना, त्यांनी आपल्या कार्यातून एक चांगली प्रतिमा तयार केली आहे .मुलीची जबाबदारी आणि  काम या दोन्ही जबाबदाऱ्या त्या अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत आहेत.

खऱ्या जीवनपटाची नायिका असणारी आपल्याच  करमाळ्याची आर्ची  | Archie of our own Karmalya who is the heroine of a real life movie 

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments