व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal

शिराळा: शेतीकडे केवळ उदरनिर्वाहाचे साधन म्हणून न पाहता व्यावसायिक दृष्टिकोन ठेवल्यास हा व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो ,असे प्रतिपादन कृषी महाविद्यालय कोल्हापूरचे ऊस पिक शास्रज्ञ डाॅ.अशोक पिसाळ यांनी केले.
व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal
कापरी.(ता.शिराळा) येथे कृषी अर्थशास्त्र विभाग राहुरी कृषी विद्यापीठ व श्री.जनाईदेवी शेतकरी बचत गट यांच्यामार्फत आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोहन पाटील होते.
व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal
पिसाळ म्हणाले शेती व्यवसायासमोर अनेक अडचणी आहेत. यावर मात करत असतानाच शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान,बारीकसारीक बारकावे आत्मसात करून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे.
व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal
कृषी पर्यवेक्षक डाॅ.बी.एच कांबळे यांनी राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी अर्थशास्त्र विभागाच्या ध्येय धोरणाविषयी मार्गदर्शन केले.विद्यापीठाचे कृषी सहाय्यक एस.एस.कांबळे.यांनी बहुव्यापक योजनेंतर्गत कापरी गाव दत्तक घेऊन अर्थशास्त्र विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाविषयी माहिती दिली. विविध पिक स्पर्धेत बक्षिस मिळविलेल्या गावातील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला .
व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal
या मेळाव्यास सोसायटी अध्यक्ष अशोक पाटील, कृषी सहाय्यक श्रीशैल अजेटराव, बाबुराव पाटील,भगवान पाटील,सर्जेराव पाटील, सचिन पाटील, महेश माने,प्रसाद पाटील उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक एस.एस.कांबळे यांनी केले. आभार अमोल पाटील यांनी मानले.
व्यवसायिक दृष्टिकोन ठेवल्यास शेती फायदेशीर - डाॅ.श्री.अशोक पिसाळ| Agriculture is profitable from a business point of view - Dr. Ashok Pisal
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments