शिराळा: अंत्री खुर्द-अंत्री बुद्रुक ते वाकुर्डे खुर्द ता.. शिराळा येथील रस्त्याचे काम तीस दिवसात न झाल्यास भाजप युवा मोर्चाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे उप अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती शिराळा यांना देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे, अंत्री खुर्द, अंत्री बुद्रुक ते वाकुर्डे खुर्द या गावच्यातील हद्दीतील रस्ता इजिमा क्र.७ या रस्त्याची गेले सात ते आठ वर्षापासून दुरवस्था झाली आहे. अनेकवेळा दुर्घटना झाल्या आहेत, या संदर्भात वेळोवेळी शासनास पत्रव्यवहार करून या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कळवले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघात होऊन कोणी व्यक्ती मृत्युमुखी पडल्यास त्यास शासन जबाबदार असेल. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या ३० दिवसांमध्ये या रस्त्याचे काम सुरू करून ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे.
तसेन झाल्यास भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येईल. या निवेदनाच्या प्रती आमदार मानसिंगराव नाईक , माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँक संचालक सत्यजित देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली, तहसीलदार शिराळा, पोलीस निरीक्षक शिराळा यांना देण्यात आल्या आहेत.
यावेळी भाजपा युवा मोर्चा सांगली जिल्हा प्रवक्ते राजेंद्र कुंभार ,भाजपा युवा मोर्चा शिराळा तालुका सरचिटणीस योगेश पवार,विकास माने ,अमेय दशवंत,महेश पाटील उपस्थित होते.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments