BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

३०० दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand

 ३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand
साक्षी मोबाईल शिराळा
विश्वासचं अतुट नातं

इस्लामपूर: ३०० दिव्यांग व्यक्तींनी येथील केआरपी कॉलेजमधील मोफत कृत्रिम हात-पाय दान शिबिरात सहभाग घेतला. या व्यक्तींच्या हात व पायांची मापे घेतली असून महिन्याभरात त्यांना कृत्रिम हात-पाय बसविले जाणार असून  अशा दिव्यांग व्यक्तींच्या जीवनास कृत्रिम हात-पाय बसविल्यावर निश्चितपणे उभारी मिळणार  आहे.

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand
 
       जलसंपदा मंत्री,जयंतराव पाटील,प्रतिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजारामबापू सहकारी साखर कारखाना, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी,जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्ल,वाळवा तालुका राष्ट्रवादी डॉक्टर सेल,साधू वासवाणी मिशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित केले होते. या शिबिरात वाळवा तालुक्यासह सांगली,सातारा,जत,शिराळा, पुणे,सोलापूर उस्मानाबाद,बुलढाणा,पंढरपूर, बेळगाव, निपाणी,अथणी,देवरुख आदी भागातील ३०० जणांनी सहभाग नोंदवला.  

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand
प्रो.प्रा.अतुल चं.पारेख
अल्पावधीत ग्राहकांनी गौरविलेले सौ.सुलभा भाभीचे दुकान
  
        राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.अतुल मोरे,तालुकाध्यक्ष डॉ.अनिल माळी,वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी,जयंतराव  पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली २०१७ ला असेच शिबीर घेतले होते. आता आणखी  असे  शिबीर घेतले जाणार  आहे.  रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल पार्क सिटीचे संदीप पाटनी, जायंट्स ग्रुपच्या माजी फेडरेशन अध्यक्षा डॉ.सुवर्णा माळी यांनीही आपण एकसंघपणे दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात प्रकाश आणण्या चे पुण्याचे काम करीत असल्याची भावना व्यक्त केली.

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand
 
 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष संजय पाटील,साधू वासवाणी मिशनचे मिलिंद जाधव,जायंट्स ग्रुप इस्लामपूर पर्लच्या अध्यक्षा मानसी साळुंखे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,डॉक्टर सेलचे शहराध्यक्ष डॉ.दिलीप साळुंखे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव,डॉ.संग्राम पाटील,कृष्णेचे संचालक संजय पाटील,सचिन कोळी,सुनील पोळ,बशीर मुल्ला,राजकेदार आटूगडे, प्रियांका साळुंखे उपस्थित होते.

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand
 
         प्रा.शामराव पाटील,राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष नेताजीराव पाटील,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अरुण कांबळे, शहराध्यक्ष शहाजी पाटील,महिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, प्रदेश सरचिटणीस छाया पाटील,माजी नगरसेवक विश्वनाथ डांगे,आष्टयाचे विराज शिंदे,संग्राम फडतरे,माणिक शेळके यांनी शिबिरास भेट दिली.

३०० दिव्यांगांना  मिळणार  मोफत कृत्रिम हात-पाय | 300 disabled people will get free artificial limbs and hand

हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३
animated-thank-you-image-0019

Post a Comment

0 Comments