शिराळा तालुक्यात बिबट्याने पाळीव प्राण्यांवर वारंवार हल्ला करण्याचा सपाटा लावल्याने अनेक शेळ्या मेंढ्या पालक व्यवसायीकांचे संसार उधवस्त होऊ लागले आहेत. एक दोन जनावरावर हल्ला ही नित्याचीत बाब आहे. पण एकाच वेळी सर्व प्राण्यावर हल्ला होण्याच्या संखेत दिवसेन दिवस वाढ होत आहे. त्यात शासनाकडून मिळणारी मदत ही तुटपुंजी असल्याने आम्ही जगायचं कसं हा प्रश्न पडला आहे.त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याबरोबर शासनाने पाळीव प्राण्याच्या नुकसान भरपाईत वाढ करण्याची मागणी नूकसानग्रस्त शेतकऱ्यांच्यातून होत आहे. नुकसान भरपाईत वाढ झाली तरच शेतकरी आपला संसार वाचवू शकेल. त्यामुळे कोणी नुकसान भरपाई वाढवून देता का असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आज १ मार्चला उपवळे येथे संकेत पाटील यांच्या १० शेळ्या वर व १५ कोंबड्यावर हल्ला करून त्यांना ठार मारले. तर चार शेळ्या गायब आहेत. असे १४ शेळ्यांचे नुकसान झाले आहे. ८ डिसेंबर २०२१ ला कापरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात रेड येथील सुभाष तुकाराम तांदळे या मेंढपाळाची २० कोकर ठार तर चार गायब झाली होती. १७ डिसेंबर २०२१ ला फकिरवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शिवाप्पा रामा लवटे या मेंढपाळाच्या पाच मेंढ्या जागीच ठार झाल्या होत्या. ११ जानेवारी २०२२ ला शिराळा येथील खंडागळे यांच्या शेतात खेड येथील सचिन सदाशिव माने, चंद्रकांत भिमराव वगरे, शंकर बापू कोळेकर, जगन्नाथ पांडुरंग शिरतोडे यांच्या मेंढराच्या कळपावर दोन बिबट्यानी हल्ला करून सहा मेंढराची कोकर ठार तर सहा जखमी केली होती.
पश्चिम घाटात बिबट्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक बिबट्ये जंगल सोडून बाहेर पडत आहेत. त्यांना बाहेर लपण्यासाठी वाढते ऊस क्षेत्र व जंगल मिळत आहे. ससे व डुक्कर खायला मिळत आहे. त्यामुळे त्यांना अन्नाची कमतरता भासत नाही. बिबट्या सर्व वातावरणात राहू शकतो. त्यामुळे तो ज्या भागात फिरतो त्याच भागात कायम वास्तव्य करतो. त्या परिसरात अन्नासाठी भटकत असतो.
चांदोली राष्टीय उद्यानापेक्षा शिराळा तालुक्यातील अनेक गावात बिबट्याचा वावर वाढल्याने लोक अनेक दिवसांपासून भीतीच्या छायेत वावरू लागले आहेत. वाढते उसाचे क्षेत्र व जंगल हेच त्याच्या निवाऱ्याचे प्रमुख ठिकाण बनले आहे. हा उसाचा निवाराच बनला ऊस तोडणी मजुराला घातक होऊ लागला आहे. गेल्या वर्षी २२ फेब्रुवारीला २०२१ ला उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने झाडाच्या सावलीला ठेवलेल्या एक वर्षाच्या सुफीयानचा बळी घेतला त्या नंतर या वर्षी एक महिन्या पूर्वी १ फेब्रुवारीला गणेश श्रीराम कांबिलकर या उसतोड मजुराच्या पाच वर्षाच्या मुलाला उसाच्या फडातून बिबट्याने फरफटत नेले. त्यात तो जखमी झाला पण त्याचे सुदैव चागले म्हणून तो वाचला.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments