BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala


शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala

शिराळा : शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांनी देशासाठी दिलेले बलिदान अतुलनीय आहे. येणारी पिढी त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे चालवत राहील असा विश्वास निवृत्त लष्कर अधिकारी पी. आर. पोतदार यांनी व्यक्त केला. 

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala

 

मरिमी चौक येथे झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पी. आर. पोतदार म्हणाले, भारतमातेची सेवा करत असताना रोमित यांना वीरमरण आले. त्यांचा त्याग आणि बलिदान अतुलनीय असून त्यांच्या शौर्याचा वारसा येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी असेल. 

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala

 

प्रारंभी शिराळा शहरातून श्री. शिव छत्रपती विद्यालयाच्या विद्यार्थी, आजी माजी सैनिक संघटना, प्रहार संघटना आणि नागरिकांनी कँडल मार्च काढला. अमर रहे, अमर रहे ,रोमित चव्हाण अमर रहे, अशा घोषणा देण्यात आल्या. मरीमी चौकात शहीद जवान रोमित चव्हाण यांना  मेणबत्या पेटवून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शंकर गायकवाड, संजय तमुगडे, विनायक गायकवाड, ए. आर. पाटील, ओमकार नरुटे, कैलास देसाई, बंटी नांगरे, निलेश आवटे, उज्वल लाड यांनी मनोगत व्यक्त केले.

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala

 

कार्यक्रमास शिराळा तालुका आजी-माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष ज्योतिर्लिंग पाटील, सचिव संजय तमुगडे ,शिवाजी इंगवले, गोरख पाटील, गुंगा पाटील, अमृत पाटील, ब्रह्मदेव पाटील, जयकर गायकवाड, भानुदास यमगर, राजाराम पाटील, बजरंग आंबर्डेकर, उपस्थित होते. ए. आर. पाटील, उज्वला लाड, गजाभाऊ पाटील, अविनाश खोत, रणजीत नलवडे  उपस्थित होते.

शहीद जवान रोमित तानाजी चव्हाण यांना शिराळ्यात श्रद्धांजली | Tribute paid to martyr Jawan Romit Tanaji Chavan at Shirala


इस्लामपूर येथे सुरु असणाऱ्या जयंत प्रिमियर लीगचे थेट प्रक्षेपण के न्यूज च्या माध्यमातून खास आपल्यासाठी
हॉटेल साई निसर्ग
पावनं,चुलीवरील मटण आणि भाकरीची चवचं न्यारी
Document

SHIV NEWS update

Shiv news marathi Web Portal

शिव न्यूज मराठी वेब पोर्टल

वेध स्थानिक घडामोडींचा

जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क- ९५५२५७१४९३

Post a Comment

0 Comments