राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी कृषिमंत्री शरद पवार व शिराळचे भाजपाचे माजी आमदार व माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांची आज गुरुवारी येथे यशवंतराव चव्हाण स्मृति सदन मध्ये होणारी भेट स्थगित झाली आहे. त्यामुळे ही भेट पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
आजच्या पवार-नाईक यांच्या भेटीकडे सांगली जिल्ह्यासह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. कारण या बैठकीत आमदार मानसिंगराव नाईक व शिवाजीराव नाईक यांचे मनोनोमिलन होऊन नाईक यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब होणार होता. या बैठकी संदर्भात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी दुजोरा दिला होता.आमदार मानसिंगराव नाईक हे कामानिनित्त मुंबईत होते. बुधवारी दुपारी शिवाजीराव नाईक हे बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले होते.
आज सकाळी शरद पवार यांच्या समवेत जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, आमदार मानसिंगराव नाईक , माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक व इतर प्रमुख राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार होती. पण अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीची कारवाई झाल्याने आज दिवसभर शरद पवार यांच्या नियोजित बैठका स्थगित झाल्याने नाईक यांची भेट होऊ शकली नाही. मात्र पुढील आठवड्यात पुन्हा भेट होणार असल्याचे समजते. या भेटीत काय होणार याची उत्सुकता लोकांना लागली असली तरी रणधीर नाईक हे विविध उद्घाटनाच्या निमित्ताने एकत्रित येत असल्याने शिवाजीराव नाईक यांचा राष्ट्रवादीतील पक्ष प्रवेश निश्चित मानला जात आहे.
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments