पर्यटनाच्या दृष्टीने शेवताई मंदिर परिसराला महत्त्व| Importance of Shevatai temple area in terms of tourism
शिराळा:- शेवताई मंदिर परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याने पर्यटनाच्या दृष्टीने या परिसराला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. या पुढील काळात या परिसरामध्ये मोठया प्रमाणात पर्यटन वाढ होण्यास मदत होईल असे प्रतिपादन माजी जिल्हापरिषद सदस्य रणधीर नाईक यांनी केले.
पर्यटनाच्या दृष्टीने शेवताई मंदिर परिसराला महत्त्व| Importance of Shevatai temple area in terms of tourism
मणदुर धनगरवाडा येथील शेवताईदेवी मंदिर परिसराला रणधीर नाईक यांनी दिलेल्या सदिच्छा भेटी प्रसंगी बोलत होते. नाईक म्हणाले, चांदोली अभयारण्य परिसरा लगत असणारे शेवताई देवी मंदिर व आसुबाई -भैरवनाथ मंदिराच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी विकास निधी मंजूर करून या परिसराचा विकास साधला आहे. आज पर्यटनाच्या दृष्टीने अभयारण्य बरोबर हा परिसर महत्त्वपूर्ण ठरला आहे. मणदूर ग्रामपंचायतीने झालेला विकास व पर्यटनाच्या वाढीसाठी या मंदिराचे रस्त्याला ठिकाणी दिशादर्शक फलक लावून मंदिर परिसर परिसराची देखभाल दुरुस्ती करावी.
पर्यटनाच्या दृष्टीने शेवताई मंदिर परिसराला महत्त्व| Importance of Shevatai temple area in terms of tourism
शेवताई मंदिरसाठी एक कोटी १३ लाख रुपये तर आसुबाई - भैरवनाथ मंदिरासाठी ७२ लाख रुपये खर्च करून या परिसराचा विकास झाला आहे. या मंदिरांमध्ये शिराळा शाहुवाडी व पाटण तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत. मणदुर व गुढे ग्रामपंचायतीने या दोन्ही मंदिर परिसराचे सुशोभिकरण करण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन या भागाचा लौकिक वाढवावा.
पर्यटनाच्या दृष्टीने शेवताई मंदिर परिसराला महत्त्व| Importance of Shevatai temple area in terms of tourism
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती एन डी लोहार, मणदूर सरपंच वसंत पाटील , गुढे सरपंच सखाराम दुर्गे, माजी सरपंच प्रकाश जाधव, संचालक के. वाय. भाष्ठे, हत्तेगाव उपसरपंच संदीप चोरगे, पांडुरंग गायकवाड, कैलास पाटील, अशोक बेर्डे, प्रकाश भुसारी, उपस्थित होते.
पर्यटनाच्या दृष्टीने शेवताई मंदिर परिसराला महत्त्व| Importance of Shevatai temple area in terms of tourism
0 Comments