शिराळा:उपवळे -कदमवाडी( ता.शिराळा ) येथील मोरणा धरणा जवळील बामणकी परिसरात राजू जोशी यांच्या उसाच्या फडाच्या शेजारी असणाऱ्या शेतात आज शुक्रवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास चार गव्यांचे दर्शन झाले. बिबट्या पाठोपाठ आता उसात गव्यांचा संचार वाढू लागल्याने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी पोपट कदम , दीपक कदम , संदीप शेवडे , प्रवीण शेवडे,ब्रह्मदेव गुरव, बाळकृष्ण कदम.अजित कदम हे तरुण राजू जोशी यांच्या शेतात उस तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना फडाच्या शेजारी असणाऱ्या शेतात चार गावे दिसले. त्यांनी आरडाओरडा केला असता गवे तिथून पळून गेले. याचे युवकांनी चित्रीकरण ही केले आहे. सदरचे गवे गुरुवारी रात्री मोरणा धरणा जवळील गायकवाड मळ्यात होते. येथील ठिकाणच्या पिकांचे नुकसान केल्याचे आढळून आले आहे. तिथून ते सकाळी धरणापलीकडे उपवळे येथे गेले असावेत अशी चर्चा आहे.
ते डोंगराकडे गेले.
आमच्या वन विभागाचे कर्मचारी त्या गव्यांच्या मागावर होते. उपवळे येथील शेतातून मार्ग काढत गवे दुपारी उपवळे ,तडवळे परिसरातील डोंगराकडे निघून गेले आहेत.
सचिन जाधव वनक्षेत्रपाल शिराळा.
बिबट्या व गव्यांचा बंदोबस्त करावा
उपवळे ,तडवळे या परिसरात बिबट्याचा वावर कायम असून आता त्यात गव्यांची भर पडली आहे. त्यामुळे शेतात जाताना शेतकर्यांना जीव मुठीत घेवून जावे लागत आहे. त्यामुळे वन विभागाने बिबट्या व गव्यांचा बंदोबस्त करावा .प्रवीण पाटील शेतकरी
या धरण परिसरात चार गव्यांचे दर्शन | Darshan of four cows in this dam area
SHIV NEWS update
Shiv news marathi Web Portal
शिव न्यूज मराठी वेब पोर्टल
0 Comments