BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणार| The political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

Castle

Castle

Castle

  

  टीम शिव न्यूज

शिराळा : अडचणीत असणाऱ्या संस्थाना उर्जितावस्था आणण्यासाठी राजकारणात दोन पावले मागे जाण्याची तयारी   माजी मंत्री शिवाजीराव नाईक दर्शवली असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाच्या चर्चेला उधान आले आहे. मात्र  राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक हे प्रबळ असताना त्यात शिवाजीराव नाईक यांची भर म्हणजे  एकाच म्यानात दोन तलवारी असे असले तरी हा विधानसभा मतदारसंघ हा मानसिंगराव नाईक यांच्यासाठी सुरक्षित ठेवत मंत्री जयंतराव पाटील यांनी बेरजेचे राजकारण सुरु केले आहे. या राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल शिवाजीराव नाईक यांनी दुजोरा दिला नसला तरी नकार ही दिलेला नाही. त्यामुळे गेले अनेक वर्षे वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणार हे निश्चित झाले आहे.

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

 

मंत्री जयंतराव पाटील व माजी मंत्री शिवाजीराव नाईक या वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या  नागाचा राजकीय झालेला टोकाचा संघर्ष सर्वज्ञात आहे. काही वेळा प्राप्त परिस्थिती नुसार राजकारणात दोन  पाऊल मागे घ्यावे लागते. सध्या शिवाजीराव नाईक यांच्या संस्था अडचणीत असल्याने त्यांना राजकारणा पेक्षा संस्था महत्वाच्या आहेत. राज्यात सरकार महाविकास आघाडीचे व जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक मंत्री जयंतराव पाटील यांच्या हाती आहे. योगायोगाने या बँकेचे अध्यक्षपद हे आमदार मानसिंगराव नाईक यांच्याकडे आहे. संस्था अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या संधीचा फायदा  शिवाजीराव नाईक यांना होणार आहे.

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

              

२०१४ ला शिवाजीराव नाईक यांनी भाजपात प्रवेश केला आणि आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी मंत्री नितीन गडकरी यांनी मंत्रीपद देण्याचे व २०१९ ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक आमदार द्या आम्ही तालुक्याला दोन आमदार देतो असे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन भाजपने पाळले नाही. उलट २०१९ ला अंतर्गत गटबाजीमुळे शिवाजीराव नाईक यांचा पराभव झाला. सत्यजित देशमुख यांची आमदारकी हे ही आश्वासनच राहिले. दरम्यानच्या काळात नाईक यांच्या संस्था अडचणीत असताना त्यांना भाजपकडून ठोस मदत मिळाली  नाही. एकीकडे राजकीय खच्चीकरण आणि दुसरीकडे अडचणीत आलेल्या संस्था यामुळे नाईक यांच्या अडचणी वाढू लागल्या. राजकारण करण्यासाठी संस्था सक्षम असल्या पाहिजेत. नाईक यांच्या उद्योग समूहातील दीड हजारवर कर्मचाऱ्याचा व त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कुटुंबाची वाताहत रोखणे गरजेचे आहे. याची जाणीव ठेवत जो आपल्या संस्थाना आर्थिक पाठबळ देईल त्याच्या सोबत जाणे हाच एकमेव पर्याय नाईक यांच्या समोर आहे.

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

 

 तालुक्यात राजकारण करत असताना कोणी कोणाच्या संस्थामध्ये हस्तक्षेप करायचा नाही हे शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख व आमदार मानसिंगराव नाईक यांनी पथ्य पाळले आहे. हे नुकत्याच झालेल्या विश्वास कारखान्याच्या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे. सांगली जिल्हा बँक निवडणूकीत ही तिन्ही नेत्यांची समन्वयाची भूमिका सर्वांनी अनुभवली आहे. याच माध्यमातून  मानसिंगराव नाईक यांच्यारूपाने शिराळा तालुक्याला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.नाईक यांची भाजपमध्ये होणारी गळचेपी व अडचणीत असणाऱ्या संस्था यांचा विचार करून मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांच्यासाठी मदतीचा हात देण्याची तयारी सुरु केली  आहे. शिवाजीराव नाईक यांच्या जिल्हा बँकेत प्रलंबित असणाऱ्या प्रस्तावावर जयंतराव पाटील यांच्या माध्यमातून अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी आपले राजकीय वैरत्व बाजूला ठेवत सकारात्मक निर्णय घेतल्याने संस्थेला आर्थिक बळ देण्याच्या हालचाली गतिमान झाल्याने शिवाजीराव नाईक व मानसिंगराव नाईक यांच्यात जवळीकता निर्माण झाली आहे. जो अडचणीत मदत करतो त्याबद्दल सह्नभूती ही निश्चित रहाते. संस्था मार्गी लावण्यासाठी  राजकारण गरजेचे आहे. राजकारणासाठी संस्था आणि कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे भाजपवर नाराजी व्यक्त न करता आपल्या संस्था व राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी शिवाजीराव नाईक यांना योग्य तो निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांची मते आजमावून घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यास कार्यकर्त्यांची ही सकारत्मक भूमिका असल्याचे चित्र जाणवत आहे.

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

 

  संघर्ष टाळून वर्चस्वाला संधी 

  मंत्री जयंतराव पाटील हे राज्याचे नेतृत्व करत आहेत.  त्यांना आगामी जिल्हापरिषदवर एक हाती सत्ता मिळवायची आहे. शिवाजीराव नाईक  यांचा राजकीय  व जिल्हापरिषदेचा ११ वर्षाचा अनुभव पाहता ते  राष्ट्रवादीत आले तर त्यांना वरिष्ठ पातळीवर चांगली मिळण्याची  शक्यता नाकारता येत नाही, मानसिंगराव नाईक यांच्यासाठी हा मतदार संघ सुरक्षित राहील. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती, बाजार समिती व शिराळा नगरपंचायत या ठिकाणी  राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील. रणधीर नाईक यांच्या राजकीय वाटचालीचा  व शिराळा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचा मार्ग सुखकर होईल असे कार्यकर्त्यांना वाटत असले तरी शिवाजीराव नाईक यांची भूमिका काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end

 

 "आम्हाला राजकारणा पेक्षा अडचणीत असणाऱ्या संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत करणे गरजेचे आहे.या संस्थावर दीड हजारावर कामगारांचे त्यांच्या कुटुंबाचे  भवितव्य अवलंबून आहे.आम्ही भाजपवर ही नाराज नाही मात्र प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घेवू ."शिवाजीराव नाईक  माजी राज्यमंत्री


वाळव्याच्या वाघाचा व शिराळच्या नागाचा राजकीय संघर्ष संपुष्ठात येणारThe political struggle between the walava tiger and the shirala cobra will come to an end



Post a Comment

0 Comments