BREKING NEWS -------आपल्या बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा 9552571493

जमिनींचा योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यंत कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

SHIV NEWS
MARATHI WEB PORTAL

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

शिराळा: चिखली (ता. शिराळा) येथील शेतकऱ्यांना  वारणा डाव्या कालव्यामध्ये  गेलेल्या जमिनीची ३३  वर्षे झालेली  नुकसान भरपाई  कोरडवाहू प्रमाणे न देता  बागायती जमिनी प्रमाणे  द्यावी.  जो पर्यंत नुकसान भरपाई व संपादित केलेल्या जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद ठेवू  असा इशारा माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी  शेतकऱ्यांच्यावतीने अधिकारी यांना दिला. या प्रश्नावर समन्वयाने तोडगा काढण्यासाठी १७ फेब्रुवारी रोजी चिखली येथे शेतकरी व संबंधित अधिकारी यांच्या बैठकीचे लेखी आश्वासन तहसीलदार गणेश शिंदे यांनी आंदोलकांना दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

      आज  तहसील कार्यालय  शिराळा येथे चिखली ग्रामस्थांनी ३३ वर्षे कालव्यात गेलेल्या जानिनीची नुकसान भरपाई व संपादित जमिनीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी  ठिय्या आंदोलन केले.  यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, रणजितसिंह नाईक, सुखदेव पाटील यांची प्रमुख  उपस्थिती होती.

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

 यावेळी  नाईक म्हणाले, चिखलीच्या शेतकऱ्याच्या  जमिनी गेली ३३  वर्षे पाटबंधारे विभागाने वारणा डाव्या कालव्यासाठी संपादित केल्या आहेत. मात्र या शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई शासनाने  दिलेली नाही. त्यामुळे हे ग्रामस्थ आक्रमक होऊन शिराळा येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या मांडून  आंदोलनास बसले आहेत.जो पर्यंत संपादित जमिनीचा मोबदला व नुकसान भरपाई मिळत नाही .तो पर्यंत कालव्याची कामे करून देणार नाही.

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

प्रारंभी  शिराळा बाजार समिती पासून  आंदोलकांनी मोर्च्या काढून तहसीलदार कार्यालया पर्यंत नेला. आमच्या मागण्या मान्य करा, अकार्यक्षम अधिकाऱ्यांचा  धिक्कार असो अशा घोषणा देत   आंदोलकांनी  आपला रोष व्यक्त केला. 

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

यावेळी  तहसीलदार गणेश शिंदे , कार्यकारी अभियंता देवाप्पा  शिंदे , नायब  तहसीलदार व्ही. डी. महाजन,सहाय्यक अभियंता अनिल लांडगे,  अनिकेत शिर्के ,शाखा  अभियंता विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले , या पुढील काळात अधिकाऱ्यांच्याकडून कोणाची ही  अवहेलना होणार नाही याची काळजी घेत योग्य तो सन्मान ठेवला जाईल. डाव्या कालव्याच्या बाधित  शेतकर्‍यांच्या प्रश्नाबाबत १७  फेब्रुवारी रोजी सर्व संबंधित अधिकारी यांच्यासमवेत चिखली येथे बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढला जाईल. 

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

  कार्यकारी अभियंता  शिंदे म्हणाले , आपल्या मागणी बाबाबत शासन स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर शासन   अनुकूल असून लवकरच मार्ग निघेल.  

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

जाहिरात 

       यावेळी  पी. डी. पाटील, संजय नाईक , सागर नाईक, महादेव नाईक, दिनकर साळुंखे, निखिल साळुंखे, विजय गायकवाड ,संजय साळुंखे, बाबासो साळुंखे , दादा साळुंखे,  बाजीराव साळूंखे, विलास साळुंखे , शशिकांत चौगुले, मानसिंग गायकवाड, विजय गायकवाड, सागर साळुंखे , युराज साळुंखे, बाळाबाई चौगुले, शालन साळुंखे ,उल्का साळुंखे,पुष्प गायकवाड, वैशाली साळुंखे, उपस्थित होते. 

 जमिनींचा  योग्य मोबदला मिळत नाही तो  पर्यंत  कालव्याचे काम बंद |The canal work will be stopped till the land is properly remunerated

Post a Comment

0 Comments