गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
शिराळा हद्दीमधील सर्वे नं ११८ मधील गायरान जमिनीतील प्लाॅट गरजू व भूमिहीन मजुरांना सनद नुसार ७/१२ ला नोंद करून मिळावी अशी मागणी नगरसेवक केदार नलवडे व राम जाधव यांनी तहसील कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
निवेदनात म्हटले आहे की, शिराळा येथील सर्वे नंबर ११८ मध्ये सेल १९८२ ते १९८८ या कालावधीत बेघर व गरजू मजूर लोकांना प्लॉट वाटप झाले होते .त्याबाबत खातेदारांना सनद व आदेश प्राप्त झाले होते. त्यामधील काही लोकांनी त्यावेळी मिळालेल्या आदेशानुसार नुसार ७/१२ नोंदी घातल्या आहेत.
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
परंतु काही अशिक्षित लोकांच्या सातबारा नोंदी घालते राहून गेले होते. त्यामुळे ज्यांच्या नोंदी नाहीत अशा लोकांना कोणत्याही शासकीय सुविधांचा लाभ घेता येत नाही. त्यापैकी काही खातेदार मयत झाले असून त्यांच्या वारस नोंदी ही करता येत नाहीत. त्यामुळे वारस नोंद होत नसल्याने वारसा हक्क सिद्ध होण्यास अडचणीचे ठरत आहे. अनेकांना सरकारी कामात अडथळे निर्माण होत आहेत.
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
तरी संबंधित प्रशासनाने ज्या लोकांच्या नोंदी आहेत. अशा लोकांना जमिनीतील शर्त कमी करण्यासंदर्भात नोटीस काढली असून जागे मधील भो वर्ग २ कमी करून त्या खातेदारांना भो वर्ग एकचे सातबारा प्रशासनाकडून प्राप्त होणार आहेत. तरी शासकीय योजनांसाठी सातबारा नोंद होणे अतिशय गरजेचे असून सदर जागेची नोंद करून त्याची शर्त कमी करण्याविषयी होणारी शासकीय रक्कम दोन हप्त्यांमध्ये भरण्यास आम्ही सर्व लोक तयार आहेत. त्या प्रमाणे कार्यवाही करून त्यांच्या नावे सातबारा तयार करून मिळावा.
गरजू व भूमिहीन मजुरांचे प्लाॅट ७/१२ ला नोंद करून द्या |Register the plot of needy and landless laborers on 7/12
0 Comments